Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यातील व्यवस्थापनाने वाढेल उत्पादन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा आहे. मात्र, अशा अवस्थेत पुसा येथील कृषितज्ञांच्या सल्ल्याचे पालन केले तर उत्पादनात अधिकची वाढ होणार आहे. त्याअनुशंगाने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे. सध्याचे तापमान, वाऱ्याचा वेग आणि धान्याची असलेली अवस्था पाहता एक पाणी पिकांना दिले तर उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, अधिकचा वारा असताना जर पिकांना पाणी दिले तर पडझड होणार आहे.

Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यातील व्यवस्थापनाने वाढेल उत्पादन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
यंदा पोषक वातावरणामुळे गव्हाच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे

|

Mar 13, 2022 | 1:25 PM

मुंबई : सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा आहे. मात्र, अशा अवस्थेत पुसा येथील ( Advice from agronomists) कृषितज्ञांच्या सल्ल्याचे पालन केले तर उत्पादनात अधिकची वाढ होणार आहे. त्याअनुशंगाने (Indian Agricultural Research Institute) भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे. सध्याचे तापमान, वाऱ्याचा वेग आणि धान्याची असलेली अवस्था पाहता एक पाणी पिकांना दिले तर (Production) उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, अधिकचा वारा असताना जर पिकांना पाणी दिले तर पडझड होणार आहे. त्यामुळे हवामान पाहूनच पाऊल उचलणे गरजेचे आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळे गहू काळवंडण्याचा धोका असतो. अशा प्रसंगी पिकास डायथेन एम-45 हे 5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 1.0 ग्रॅम हे लीटर पाणी मिसळून फवारणी करावी लागणार आहे. तर दुसरीकडे मोहरीच्या शेंगा परिपक्व झाल्यास काढणीला सुरवात करावी लागणार आहे. शेंगा पक्व होऊनही अधिकचे काळ मोहरी वावरात राहिली तर शेंगगळतीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे लवकर कापणी आणि मळणी ही महत्वाची आहे.

मूग पेरणीसाठी या वाणाची निवड करा

मूग पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सुधारित बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादनही वाढते आणि पीक जोमात बहरते. मूग-पुसा विशाल, पुसा रत्न, पुसा-5931, पुसा बैसाखी, पी.डी.M.-11, एसएमएल-32, एसएमएल-668, सम्राट यापैकी एका वाणाची निवड केली तरी उत्पादनात भर पडणार आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांवर रायझोबियम आणि फॉस्फरस विद्रव्य जीवाणूंद्वारे बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. पेरणीच्या वेळी शेतजमिनीत ओल असणे आवश्यक असते.

फवारणीनंतर आठ दिवसांनीच भाज्याची तोड करावी

फळ खाणाऱ्या कीटकांची संख्या अधिक असल्यास 1.0 ग्रॅम बिटी हे 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. याची फवारणी करुनही परिणाम झाला नाही तर मग मात्र, 15 दिवसांनी स्पाइनोसेइड कीटकनाशक 48 EC हे 1 मिली 4 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. भाज्यांमध्ये चेपाच्या आक्रमणावर लक्ष ठेवावे लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे याचा परिणाम होत नसला तरी कीटकांची संख्या जास्त असल्यास इमिडाक्लोप्रिड 0.25 मि.लि. हे भाज्यांची तोडणी झाल्यानंतर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीनंतर किमान आठवडाभर भाजीपाला तोडणी करता येत नाही.

संबंधित बातम्या :

महावितरणचा ‘शॉक’ फळबागांनाही, अस्मानी संकटानंतर आता सुल्तानी संकटाशी सामना

सोयापेंड, सोयाबीन नंतर पोल्ट्रीधारकांचे लक्ष आता गहू – तांदळावर, काय आहे नेमके कारण?

अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें