AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : शेतीमालाच्या दरात घट, शेतकऱ्यांसाठी ‘वेट अॅंण्ड वॉच’चा सल्ला..!

कृषी बाजार समितीमध्ये सध्या आवक असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभरा या तिन्ही शेतीमालाच्या दरात काही प्रमाणात का होईना घट झालेली आहे. सध्या सोयाबीन आणि हरभरा या पिकाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून घटत्या दराचा आवकवर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही 8 हजारांपर्यंत दर गेलेला नाही. शेतकऱ्यांना 10 हजारपर्यंत दर वाढतील अशी अपेक्षा होती पण बाजारपेठेत म्हणावा तसा उठावच झाला नाही.

Latur Market : शेतीमालाच्या दरात घट, शेतकऱ्यांसाठी 'वेट अॅंण्ड वॉच'चा सल्ला..!
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 23, 2022 | 3:00 PM
Share

लातूर : कृषी बाजार समितीमध्ये सध्या आवक असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभरा या तिन्ही शेतीमालाच्या दरात काही प्रमाणात का होईना घट (Rate Fall) झालेली आहे. सध्या सोयाबीन आणि हरभरा या पिकाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून घटत्या दराचा (Agricultural commodities Arrival) आवकवर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. (Soybean Season) सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही 8 हजारांपर्यंत दर गेलेला नाही. शेतकऱ्यांना 10 हजारपर्यंत दर वाढतील अशी अपेक्षा होती पण बाजारपेठेत म्हणावा तसा उठावच झाला नाही. त्यामुळे 7 हजार 600 पेक्षा अधिकचा दर हा मिळालाच नाही. तर दुसरीकडे हरभरा दरातही घट होत आहे. 4 हजार 500 वरील हरभरा आता 4 हजार 400 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने शेतीमालाची विक्री करण्याचा सल्ला व्यापारी तसेच प्रक्रिया उद्योजक अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.

सोयाबीनच्या आवकमध्ये सातत्य

हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरावरच आवक ही अवलंबून राहिलेली आहे. अधिकचे दर असले तर सर्वसाधारण आवक आणि कमी असले तरी आवकच होत नव्हती. घटलेल्या उत्पादनामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होणार हे शेतकऱ्यांना माहिती होते. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या भूमिकेवर अनेकवेळा दर हे बदलले आहेत. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात चित्र हे बदललेले आहे. 7 हजार 350 वर स्थिरावलेल्या सोयाबीनचा दर आता 7 हजार 220 रुपये प्रति क्विंटल असा आहे. असे असतानाही सोयाबीनची आवक ही सुरुच आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीन आणि संपूर्ण हंगामातील स्थिती पाहता साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री करण्यावरच शेतकऱ्यांचा भऱ आहे.

तूर, हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर

सोयाबीन पाठोपाठ लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि रब्बीतील हरभरा या पिकाची आवक होत आहे. शिवाय हमीभाव केंद्रावरही विक्री सुरु आहे. हरभऱ्यासाठी शासनाने 5 हजार 230 रुपये क्विंटल असा दर ठरविला आहे तर सध्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 440 रुपये असा दर आहे. क्विंटलमागे 800 रुपयांचा फरक असल्याने शेतकरी आता हमीभाव केंद्रच जवळ करु लागले आहेत. तुरीचीही हीच अवस्था असून हमीभावापेक्षा 150 रुपये कमी बाजारपेठेत दर आहेत. एकंदरीत शेतीमालाची आवक वाढली आणि मागणी कमी झाली आहे.

काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आता पैशांची गरज भासते. शेती मशागत, बि-बियाणे यासाठी जमवाजमव केली जाते. यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनसह तूर आणि हरभऱ्याची आवक वाढली आहे. वाढत्या आवकमुळेच दरात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदम आवक न वाढविता टप्प्याटप्प्याने शेतीमालाची विक्री करणे गरजेचे आहे. साठवणूक करुन ठेवल्यास हरभरा आणि तुरीच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea : मोहिम फत्ते, हरभरा पिकाने शासकीय गोदामेही फुल्ल, शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर

Cotton Crop : बाजार समितीचा पुढाकार अन् पीक पध्दतीमध्ये बदल, आटपाडीला मिळणार गतवैभव !

Akola : शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांचा चुराडा, शॉर्ट सर्किटमुळे हातातोंडाशी आलेला गहू आगीच्या भक्ष्यस्थानी

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार