AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea : मोहिम फत्ते, हरभरा पिकाने शासकीय गोदामेही फुल्ल, शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर

यंदा उन्हाळी हंगमात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये असा काय बदल केला आहे की, उत्पादनात आणि उत्पन्नामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला होता. शिवाय उताराही अधिक पडल्याने वखार महामंडळाच्या विविध गोदामामध्ये सुमारे 1 लाख 75 हजार टन हरभऱ्याची साठवणूक झाली आहे. असे असतानाही राज्यातील खरेदी केंद्रवर ही विक्री सुरुच आहे.

Chickpea : मोहिम फत्ते, हरभरा पिकाने  शासकीय गोदामेही फुल्ल, शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर
यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यानुसारच उत्पादनातही वाढ झाली आहे.
| Updated on: Apr 23, 2022 | 2:38 PM
Share

पुणे : यंदा उन्हाळी हंगमात शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये असा काय बदल केला आहे की, उत्पादनात आणि उत्पन्नामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर (Chickpea Crop) हरभऱ्याचा पेरा झाला होता. शिवाय उताराही अधिक पडल्याने (Warehousing Corporation) वखार महामंडळाच्या विविध गोदामामध्ये सुमारे 1 लाख 75 हजार टन हरभऱ्याची साठवणूक झाली आहे. असे असतानाही राज्यातील खरेदी केंद्रवर ही विक्री सुरुच आहे. केवळ खरेदी केलेलाच हरभरा नाही तर व्यापारी खरेदीसह शेतीमाल तारण योजनेतील साठवणूक केली जाते. अखेर विक्रमी उत्पादनात वाढ झाल्यानेच हे शक्य झाले आहे.

21 जिल्ह्यातील गोदामांमध्ये हरभऱ्याची साठवणूक

नाफेडच्या वतीने राज्यभर हरभरा हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. 1 मार्चपासून या हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. खरेदी केंद्रावरील हरभरा, शासकीय खरेदी, व्यापाऱ्यांनी केलेली खरेदी तसेच शेतीमाल तारण योजनेतील साठवणूक केलेला हरभरा हा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आला आहे. राज्यातील 6 विभागातील 21 जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या गोदामात या पिकाची साठवणूक केली आहे.

हरभरा उत्पादनात वाढ

यंदा हरभऱ्यासाठी पोषक वातावरण असल्याने कृषी विभागाने देखील हरभऱ्याच्या पेरणीबाबत मार्गदर्शन केले होते. शिवाय शेतकऱ्यांसमोर देखील हाच पर्याय चांगला होता. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा तर झालाच पण एकरी 10 ते 12 क्विंटलचा उतारा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी या मुख्य पिकाला डावलून हरभऱ्यावर भर दिला होता. अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम इतर पिकांवर झाला असला तरी हरभऱ्याचे नुकसान टळले होते.

विभागानिहाय असा आहे हरभऱ्याचा साठा

राज्यातील सहा विभागातील 21 जिल्ह्यामध्ये वखार महामंडळाची गोदमे उभारण्यात आली आहेत. यामध्ये अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील गोदामामध्ये 64 हजार 522 टन, औरंगाबाद विभागातील 2 जिल्ह्यामध्ये 8 हजार 265 टन, लातूर विभागातील 5 जिल्ह्यातील वखार महामंडळात 78 हजार 532 टन, नागपूर विभागातील 4 जिल्ह्यातील गोदामात 6 हजार 748 टन, नाशिक विभागातील 3 जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात 16 हजार 131 टन तर पुणे विभागातील 2 जिल्ह्यातील गोदामात 3 हजार 712 टन हरभऱ्याची साठवणूक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Crop : बाजार समितीचा पुढाकार अन् पीक पध्दतीमध्ये बदल, आटपाडीला मिळणार गतवैभव !

Akola : शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांचा चुराडा, शॉर्ट सर्किटमुळे हातातोंडाशी आलेला गहू आगीच्या भक्ष्यस्थानी

Jalna | जालन्यातील सीड हबचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार, कृषी मंत्री दादा भुसे यांचं आश्वासन, मुबलक बियाणं व खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.