AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Season: उन्हाळी सोयाबीन विकायचा विचारयं..! मग आगोदर दराचे चित्र काय ते पहाच?

उन्हाळी हंगामातील सोयाबीनची उत्पादकता ही कमी असते असे सांगितले जात होते पण झाले उलटेच. पोषक वातावरणामुळे बिगर हंगामातही उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरला आहे. संपूर्ण हंगामात पाण्याची उपलब्धता, पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे परिश्रम हे कामी आले आहेत. एकरी 8 ते 9 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळत आहे.

Summer Season: उन्हाळी सोयाबीन विकायचा विचारयं..! मग आगोदर दराचे चित्र काय ते पहाच?
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 23, 2022 | 1:56 PM
Share

लातूर :  (Summer Crop) उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी जो (Soybean Crop) सोयाबीनचा प्रयोग केला होता तो यशस्वी होताना दिसत आहे. कारण सोयाबीन काढणी सुरु असून उन्हाळ्यातील वातावरण पोषक असल्याचे उत्पादकतेवरुन दिसून येत आहे. पाण्याची उपलब्धता आणि अवकाळीचे संकट दूर झाल्याने उन्हाळी सोयाबीन चांगलेच बहरले होते. आता काढणी करुन शेतकरी विक्री करण्याच्या तयारीत असेल तर  (Soybean Rate) सोयाबीनचे दर अवगत असणे गरजेचे आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असून आता सोयाबीन हे 6 हजार 750 असा दर आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची साठवणूक की विक्री हा प्रश्न कायम आहे.

उन्हाळी हंगामात सरासरीएवढे उत्पादन

उन्हाळी हंगामातील सोयाबीनची उत्पादकता ही कमी असते असे सांगितले जात होते पण झाले उलटेच. पोषक वातावरणामुळे बिगर हंगामातही उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरला आहे. संपूर्ण हंगामात पाण्याची उपलब्धता, पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे परिश्रम हे कामी आले आहेत. एकरी 8 ते 9 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जो उद्देश ठेऊन हा वेगळा प्रयोग केला होता तो यशस्वी झाला आहे. आता अपेक्षित दर मिळाला तर मोहिम फत्तेच होईल आशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

सध्या मार्केटमधले चित्र काय?

गेल्या महिन्याभरापासून केवळ सोयाबीनच नाही तर तूर आणि हरभऱ्याच्या दरातही घट होत आहे. एप्रिल महिन्यात सोयाबीनला 7 हजार 100 असा दर होता. मात्र, सोयापेंडची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताच दरात घसरण सुरु झाली होती. आता 6 हजार 750 सोयाबीनला दर मिळत आहे. ज्या काळात सोयाबीनचे दर वाढणे हे अपेक्षित होते. तिथे शेतीमालाच्या दरात घसरण सुरु झालेली आहे. तूरीलाही हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला आहे तर दुसरीकडे हरभऱ्याचा हमीभाव आणि बाजारभाव यामध्ये 1 हजार रुपयांची तफावत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.

शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

सध्या सर्वच शेतीमालाचे दर हे घसरत आहेत. सोयाबीन दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण आता 6 हजार 750 दर मिळत आहे. हा सरासरी एवढा दर आहे. मात्र, उन्हाळी हंगामात उत्पादन आणि उत्पादकता पाहता शेतकऱ्यांनी काही काळ थांबून सोयाबीन विक्रीचा विचार करावा असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पादन तर घेतले आहे पण मनातला दर सोयाबीनला मिळणार का हे पहावे लागणार आहे.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?