AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea Crop : रब्बीतला हरभरा थप्पीलाच, राज्याचा प्रस्ताव अन् केंद्राच्या धोरणात अडकली खरेदी

खरेदी केंद्राच्या माध्यमातून नाफेड किती मालाची खरेदी करणार हे आगोदरच स्पष्ट झालेले असते. असे असताना केंद्र सुरु होताच नोंदणीला सुरवात झाली होती. शिवाय यंदा हरभऱ्याचे उत्पादनही वाढेल अन् खरेदी केंद्रांची सख्याही. त्यामुळे अवघ्या दिवसांमध्येच नाफेडने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे राज्यात 29 मे पर्यंत सुरु राहणारे खरेदी केंद्र हे 23 मे रोजीच बंद झाली.

Chickpea Crop : रब्बीतला हरभरा थप्पीलाच, राज्याचा प्रस्ताव अन् केंद्राच्या धोरणात अडकली खरेदी
आता चांगल्या प्रतिच्या हरभऱ्यालाच चांगला दर मिळत आहे.
| Updated on: Jun 30, 2022 | 6:19 PM
Share

अकोला : शेतीमालाच्या खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांकडील मालाची काय स्थिती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे (Chickpea Crop) हरभरा हे पीक आहे. मुदतीपुर्वीच बंद झालेली (Shopping Center) खरेदी केंद्र अद्यापही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे हमीभाव तर नाही पण बाजारपेठेत मिळेल त्या दराने हरभरा विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एवढेच नाहीतर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केंद्रावर घेण्यात आला त्याचे चुकारेही अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांची परवड केवळ व्यापाऱ्यांकडूनच होते असे नाहीतर शासनाकडूनही अशाप्रकारे अडवणूक होत असल्याचा प्रत्यय सध्या राज्यात येत आहे. मुदतीपेक्षा 7 दिवस अगोदरच खेरदी केंद्र बंद झाल्याने हरभरा थप्पीलाच आहे शिवाय ज्यांनी विक्री केली त्यांना बिलाची प्रतिक्षा आहे. सरकारचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण असाच काहीसा प्रकार हरभरा खरेदीबाबत झालेला आहे.

नोंदणी झालेले शेतकरीही संभ्रमात

हरभरा खरेदी करण्यापूर्वी त्याची केंद्रावर नोंदणी करावी लागते. यंदा बाजारभावापेक्षा खरेदी केंद्रावर अधिकचा दर असल्याने शेतकऱ्यांनी केंद्राकडे मोर्चा वळवला. सातबारा, आठ ‘अ’, आधारकार्ड, बॅंक पासबूक आदी कागदपत्रे जमा करून नोंदणी केली. मात्र, 29 मे रोजी बंद होणारी खरेदी केंद्र ही 23 मे लाच बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी रखडली आहे. आता केंद्र बंद होऊन महिना उलटला त्यामुळे हरभऱ्याचे करावे काय असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात आहे.

उद्दिष्टपूर्ती होताच सरकारने घेतला निर्णय

खरेदी केंद्राच्या माध्यमातून नाफेड किती मालाची खरेदी करणार हे आगोदरच स्पष्ट झालेले असते. असे असताना केंद्र सुरु होताच नोंदणीला सुरवात झाली होती. शिवाय यंदा हरभऱ्याचे उत्पादनही वाढेल अन् खरेदी केंद्रांची सख्याही. त्यामुळे अवघ्या दिवसांमध्येच नाफेडने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे राज्यात 29 मे पर्यंत सुरु राहणारे खरेदी केंद्र हे 23 मे रोजीच बंद झाली. अचानाक झालेल्या निर्णयामुळे दोन दिवस हरभरा विक्रीसाठी आलेली वाहने ही केंद्राबाहेरच होती. मात्र, हरभरा खरेदीचे उद्दिष्टपूर्ण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे खरेदी केंद्र चालकांनी सांगितले आहे.

राज्याच्या प्रस्तावाकडे केंद्राचे दुर्लक्ष

नाफेडने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाहीतर ज्या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली त्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 600 असा दर आहे तर खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा आहे. त्यामुळे क्विंटलमागे 600 रुपये नुकसान होत असल्याने राज्यात पुन्हा खरेदी केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे दिला आहे. मात्र, महिना उलटूनही यावर निर्णय झालेला नाही.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.