ऊसाच्या पाचटाचे करायचे काय? जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

| Updated on: Dec 18, 2021 | 3:01 PM

सध्या ऊसतोडणीचे काम जोमात सुरु आहे. ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट हे पेटवून खोडवा ऊसाची तयारी करतो. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. सेंद्रिय कर्ब वाढून उत्पादनात देखील वाढ होते. एवढेच नाही तर पाचट कुजवल्याने पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.

ऊसाच्या पाचटाचे करायचे काय? जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
ऊसाच्या पाचटाचे संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : सध्या ऊसतोडणीचे काम जोमात सुरु आहे. ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट हे पेटवून खोडवा ऊसाची तयारी करतो. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. सेंद्रिय कर्ब वाढून उत्पादनात देखील वाढ होते. एवढेच नाही तर पाचट कुजवल्याने पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. शेतजमिनीमध्ये पाला – पाचोळा, कुजवणे, शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केल्यास जमिन सुपिकता तर वाढणार आहेच शिवाय उत्पादनातही वाढ होणार असल्याचे कृषितज्ञ राम रोडगे यांनी सांगितले आहे.

पाण्याची बचत अन् तणनियंत्रणही

ऊसाचे पाचट जाळले तर जमिनीला उपयुक्त असलेले घटक हे नष्ट होतात. वातावरणदेखील प्रदूषित होते. ह्याच पाचटाची कुट्टी करुन जमिनीत कुजवले तर मात्र, जमिनीचा पोत सुधारतो. पाचटाच्या अच्छादनामुळे उन्हाळ्यात पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखले जाते त्यामुळे पाण्याची बचतही होते. पाचटाच्या अच्छादनामुळे ऊसात पुन्हा तणही लवकर येत नाही. जमिन सुपिकतेसाठी उपयुक्त गांडूळ जीवजंतूचे संवर्धन होते.

असे करा पाचटाचा वापर

ऊसाची तोडणी झाली की, ते जाळून किंवा फेकून न देता ऊस लागवड असलेल्या क्षेत्रावर ते पसरुन घ्यावे लागणार आहे. ट्रक्टरच्या सहायाने मशिनद्वारे पाचटाची कुट्टी करुन घेतल्यानंतर ती कुट्टी कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सुफर फास्फेट खत टाकून पाणी द्यावे लागणार आहे. त्यानंतर यामध्ये छोट्या ट्रक्टरच्या सहायाने रोटाव्हेटर फिरवल्याने पाचट हे जमिनीत चांगले मिसळते. मिसळलेल्या पाचटासहीत ऊस पिकाला मातीची भर द्यावी लागणार आहे.

पाचट कुजवण्याचे हे आहेत फायदे

किमान एका हेक्टरात 8 ते 10 टन पाचट हे मिळतेच. या पाचटातून 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फूरद, 1 टक्का पालाश तर 32 ते 40 टक्के सेंद्रिय अर्ब मिळते. म्हणजेच पाचटातून 40 किलो नत्र, 20 ते 30 स्फूरद आणि 75 ते 100 किलो पालाश मिळते. सेंद्रिय अर्बाच्या माध्यमातून जमिनीची सुपिकता तर वाढतेच पण पिकांची वाढही होते. सेंद्रिय पदार्थ कुजत असल्याने कार्बन डायअॅक्साईड वायू बाहेर पडतो व तो पिकांना कर्बग्रहण कार्यात उपयोगी ठरतो. त्यामुळेच ऊसाचे पाचट जाळण्यापेक्षा ते शेतामध्ये कुजवणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.

संबंधित बातम्या :

जगात सर्वाधिक सेंद्रिय शेती भारतामध्येच..! काय आहेत फायदे ? जाणून घ्या सर्वकाही

Pik Vima : पावसाने खरिपाचे नुकसान अन् आता भरपाई न मिळाल्याने तक्रारींचा पाऊस, काय होणार पीक विम्याचे?

ऊसाला कांदा भारी, कशामुळे होतोय पश्चिम महाराष्ट्रात पीक पध्दतीमध्ये बदल?