AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pik Vima : पावसाने खरिपाचे नुकसान अन् आता भरपाई न मिळाल्याने तक्रारींचा पाऊस, काय होणार पीक विम्याचे?

खरीप हंगामातील पिके जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे वेळेत विमा रक्कम मिळेल असा आशावाद होतो. एवढेच नाही विमा कंपन्यांनी दिवाळीतच नुकसानभरपाई देण्याच्या सुचना राज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या होत्या. वेळेच्या नियमांचे सोडा आता भरपाईची रक्कम मिळते का नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Pik Vima : पावसाने खरिपाचे नुकसान अन् आता भरपाई न मिळाल्याने तक्रारींचा पाऊस, काय होणार पीक विम्याचे?
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Dec 18, 2021 | 1:14 PM
Share

लातूर : (Kharif Season) खरीप हंगामातील पिके जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे वेळेत (Crop Insurance Amount) विमा रक्कम मिळेल असा आशावाद होतो. एवढेच नाही विमा कंपन्यांनी दिवाळीतच नुकसानभरपाई देण्याच्या सुचना राज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या होत्या. वेळेच्या नियमांचे सोडा आता भरपाईची रक्कम मिळते का नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण गतआठवड्यात विमा कंपन्यांनी नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात केली आहे. मात्र, आता सहा दिवसानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कमच जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाऊस कृषी कार्यालयात सुरु झाला आहे. दिवस उजाडताच शेतकरी तक्रार घेऊन तालुका कृषी कार्यालयात पोहचत आहेत. सर्वाधिक तक्रारी उस्मानाबाद जिल्ह्यातून दाखल झाल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्जाचे भवितव्य काय?

शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरापासून राज्य स्तरीय समिती नेमली जाते. तालुकास्तरीय समितीचे अध्य़क्ष हे तहसीलदार तर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. यामध्ये कृषी अधिकारी, विमा प्रतिनीधी, दुय्यम निबंधक, शेतकरी प्रतिनीधी यांचा समावेश असतो. शेतकऱ्यांच्या तक्रारी एकत्र करुन त्यावर काय तोडगा निघू शकतो याचा अभ्यास ही समिती करते. यामध्ये चूक कोणाची आहे ? विमा काढताना नेमके काय झाले होते. त्यानुसार तालुका समिती निर्णय देते. यामध्ये शेतकरी किंवा विमा कंपनी ही जर असमाधानी असेल तर मग जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समिती यामध्ये हस्तक्षेप करते. यामध्येही पर्याय निघाला नाही तर मात्र, कोर्टात न्याय मागण्याचा अधिकार विमा कंपनीला आणि शेतकऱ्यांनाही आहे.

ही तर शेतकऱ्यांची फसवणूकच

पीक नुकसानीनंतर 72 तासाच्या आतमध्ये नुकसानीचे फोटो माहिती ही शेतकऱ्यांना ऑनलाईन करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी ही प्रक्रियाही पूर्ण केली मात्र, ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पीक विमा नुकसानीचा पंचनामा करण्यास महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनीधी असताना देखील प्रत्यक्षात नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही. आता पाच दिवस उलटूनही रक्कम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकऱ्यांनी तक्रारीचे अर्ज करण्यास सुरवात केली आहे. सर्वाधिक अर्ज हे उस्मानाबाद जिल्ह्यातून दाखल झाले आहेत.

क्षुल्लक गोष्टीमुळे शेतकऱ्यांना त्रास

पीक पाहणी आणि पंचनाम्या दरम्यान, नुकसानभरपाईचे आश्वासन हे विमा कंपनीच्या प्रतिनीधींकडूनही देण्यात आले होते. मात्र, भरपाईमध्ये गटानिहाय बदल आहे. त्यामुळे एकाच गटातील शेतकऱ्याला भरपाई रक्कम मिळाली आहे तर दुसऱ्या त्याच गटातील शेतकरी हा या रकमेपासून दूर राहिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. यापूर्वीही उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला होता. मात्र, तक्रारदार शेतकऱ्यांची संख्या ही वाढतच आहे. आता तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

संबंधित बातम्या :

ऊसाला कांदा भारी, कशामुळे होतोय पश्चिम महाराष्ट्रात पीक पध्दतीमध्ये बदल?

Rabi Season : काय सांगता ? रब्बीत काळ्या गव्हाचा पेरा, शेतकऱ्याच्या नव्या प्रयोगाचे कृषी विभागालाही कुतूहल

शेतकऱ्यांनो केवळ तक्रारी करा, थकीत ‘एफआरपी’ तो ही व्याजासकट पदरात पडेल

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.