जगात सर्वाधिक सेंद्रिय शेती भारतामध्येच..! काय आहेत फायदे ? जाणून घ्या सर्वकाही

काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत आहे. उत्पादनवाढीसाठी रासायनिक शेतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पण त्याचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामुळे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. तरच शेतजमिनीचे आणि नागरिकांचे आरोग्य हे चांगले राहणार आहे.

जगात सर्वाधिक सेंद्रिय शेती भारतामध्येच..! काय आहेत फायदे ? जाणून घ्या सर्वकाही
नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी या उत्पादनाच्या निर्यातीचे धोरण ठरवले जात आहे.
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 1:58 PM

मुंबई : काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत आहे. उत्पादनवाढीसाठी रासायनिक शेतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पण त्याचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामुळे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. तरच शेतजमिनीचे आणि नागरिकांचे आरोग्य हे चांगले राहणार आहे. याशिवाय ( (Benefits of Organic Farming) ) सेंद्रिय उत्पादनांनाही बाजारात चांगला भाव मिळतो. या कारणांमुळे भारतातील (Farmers) शेतकरी अधिकाधिक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. कमी जमिनीक्षेत्रावर अधिक उत्पादनासाठी शेतात रासायनिक खतांचा वापर केला जातो. यामुळे उत्पादनही वाढते, परंतु ते आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळेच रसायनांच्या वापराबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे.

सेंद्रिय शेतीला वेळ लागतो मात्र, गुणवत्ता सुधारते

वाढत्या रासायनिक खतांमुळे शेतजमिनाचे अन् नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आहे. रसायनिक खतांचा वापर थांबवण्यासाठी आता सेंद्रिय शेतीचा पर्याय समोर येत आहे. यामध्ये रासायनिक खतांऐवजी शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केला जातो. कीटकनाशकांच्या जागी कडुनिंबाचे द्रावण, मठ्ठा, मिरची किंवा लसूण याशिवाय लाकडाची राख किंवा गोमूत्र वापरले जाते. सेंद्रिय शेती पध्दतीचा अवलंब करण्यासाठी किमान तीन वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर मात्र, उत्पादनातही वाढ होते अन् कोणतीही शेती पूर्णपणे सेंद्रिय बनवण्यासाठी तीन वर्षे लागतात. ही प्रक्रिया संथ पण टिकाऊ आहे. हे मातीची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवते.

सेंद्रिय उत्पादनात भारताचा वाटा 30 टक्के आहे.

भारतात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. जगातील एकूण सेंद्रिय उत्पादनापैकी 30 टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. सिक्कीम हे आधीच सेंद्रिय राज्य बनले आहे. त्रिपुरा आणि उत्तराखंडसह इतर अनेक राज्येही त्याच दिशेने वाटचाल करत आहेत. देशात सध्या 43 लाख 39 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सेंद्रिय शेतीसाठी नोंदणीकृत आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक सेंद्रिय क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. भारतात सुमारे 35 लाख टन सेंद्रिय उत्पादनांचे उत्पादन केले जाते. सेंद्रिय उत्पादनांमध्ये प्रामुख्याने तेलबिया, ऊस, तृणधान्ये आणि बाजरी यांचा समावेश होतो. याशिवाय भाजीपाला, कापूस, कडधान्ये, औषधी व सुगंधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे, मसाले, काजू यांचीही सेंद्रिय पद्धतीने लागवड केली जात आहे.

केंद्र सरकारही सेंद्रिय शेतीसाठी आग्रही

(Central Government) केंद्र सरकारही आता सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सेंद्रिय शेती ही एक जनचळवळ बनवण्याचे आवाहन केले आहे. शिवाय नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाच्या प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या शेतीच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढवण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळाही उभारल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे क्षेत्र तर अधिक आहेच शिवाय ते अधिक दर्जात्मक करण्यासाठी प्रयत्न हे केंद्र सरकारने सुरु केले आहेत.

संबंधित बातम्या :

Pik Vima : पावसाने खरिपाचे नुकसान अन् आता भरपाई न मिळाल्याने तक्रारींचा पाऊस, काय होणार पीक विम्याचे?

ऊसाला कांदा भारी, कशामुळे होतोय पश्चिम महाराष्ट्रात पीक पध्दतीमध्ये बदल?

Rabi Season : काय सांगता ? रब्बीत काळ्या गव्हाचा पेरा, शेतकऱ्याच्या नव्या प्रयोगाचे कृषी विभागालाही कुतूहल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.