AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Loan : दरवर्षी तेच यंदाही, उद्दिष्टपूर्ती सोडाच, गरजवंतापर्यंत पोहचले नाही खरीपचे पीक कर्ज..!

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्याच उद्देशाने पीक कर्जाचे वाटप केले जाते. मात्र, दरवर्षी उद्दिष्टपूर्ती तर होत नाही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही आणि सरकारचे उद्दिष्टही साध्य होत नाही.

Crop Loan : दरवर्षी तेच यंदाही, उद्दिष्टपूर्ती सोडाच, गरजवंतापर्यंत पोहचले नाही खरीपचे पीक कर्ज..!
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 29, 2022 | 10:13 AM
Share

औरंगाबाद : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ व्हावा, हंगाम सुखकर व्हावा यासाठी राज्य सरकारने धोरणात बदल करुन पीककर्ज वाटपाचे आदेश बॅंकांना दिले होते. पण उद्दिष्टपूर्ती सोडाच बॅंकांची यंत्रणा गरजवंत शेतकऱ्यांपर्यंतही पोहचली नसल्याचे दिसून येत आहे. कारण मराठवाड्यात केवळ 9.82 टक्केच पीक कर्जाचे वाटप झाले आहे. 10 हजार 804 कोटी वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ 1 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 60 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाल्यामुळे आता उद्दिष्टपूर्ती होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ही अवस्था असून सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यात कर्ज वितरण झाले आहे.

शेतकऱ्यांसमोर बी-बियाणांचा खर्च

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्याच उद्देशाने पीक कर्जाचे वाटप केले जाते. मात्र, दरवर्षी उद्दिष्टपूर्ती तर होत नाही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही आणि सरकारचे उद्दिष्टही साध्य होत नाही. अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आलेल्या योजनांचा त्वरीत अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने लागलीच एप्रिलपासून कर्ज वितरणास सुरवात करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण जिल्हा मध्यवर्ती बॅंक वगळता इतर बॅंकांनी उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न देखील केले गेले नाहीत.

कर्ज वितरणात बॅंकांची अशी भूमिका

पीक कर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती बॅंकांची महत्वाची भूमिका आहे. तळागळापर्यंत या बॅंकेचे जाळे असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल जिल्हा मध्यवर्ती बॅंकाकडेच असतो. त्यानुसारच मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना 2 हजार 771 कोटी, राष्ट्रीयकृत बॅंकेला 6 हजार 219 कोटी रुपये तर मराठवाडा ग्रामीण बॅंकेला 1 हजार 813 कोटी रुपये वितरण करण्यचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बॅंकांकडून 510 कोटांचे कर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकाकडून 364 कोटी तर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकाकडून 185 कोटींचे वाटप झाले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ 9 टक्केच कर्ज वितरण झाले आहे.

असे होते राज्य सरकारचे नियोजन

राज्यभरातील शेतकऱ्यांना खरिपातील बी-बियाणांसाठी पीक कर्जाचा उपयोग व्हावा म्हणून मार्चपासूनच कर्ज वाटपास सुरवात करण्यचे आदेश सरकारने दिले होते. दरवर्षी योजनेतील कर्ज वाटपास दिरंगाई होत असल्याने पीक कर्जाचा उद्देशच साध्य होत नव्हता. त्यामुळे योजनेच्या सुरवातीलाच कर्ज मंजूर करणे गरजेचे होते. यामुळे खरिपातील बी-बियाणांसाठी शेतकऱ्यांना या कर्ज रकमेचा उपयोग व्हावा हा उद्देश सरकारचा होता. पण दरवर्षी तेच यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा