2021 Audi Q5 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, जाणून घ्या नव्या लक्झरी कारमध्ये काय आहे खास?

| Updated on: Nov 22, 2021 | 10:30 PM

ऑडी इंडियाच्या (Audi India) इलेक्ट्रिक लाइनअपची सध्या बरीच चर्चा आहे. कंपनीच्या एका पॉवर प्लेयर कारचे पुनरागमन होत आहे, जी जर्मन लक्झरी ब्रँडच्या विक्रीच्या आकड्यांना चालना देऊ शकते.

2021 Audi Q5 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, जाणून घ्या नव्या लक्झरी कारमध्ये काय आहे खास?
2021 Audi Q5
Follow us on

मुंबई : ऑडी इंडियाच्या (Audi India) इलेक्ट्रिक लाइनअपची सध्या बरीच चर्चा आहे. कंपनीच्या एका पॉवर प्लेयर कारचे पुनरागमन होत आहे, जी जर्मन लक्झरी ब्रँडच्या विक्रीच्या आकड्यांना चालना देऊ शकते. 2021 ऑडी Q5 बॅटरीवर चालणारी कार नाही, मात्र लक्झरी SUV स्पेसमध्ये प्रतिस्पर्ध्यांना पुन्हा एकदा आव्हान देण्यासाठी सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. (2021 audi Q5 to be launched in india on 23rd November, check price and features)

ऑडी Q5 केवळ ब्रँडसाठीच नव्हे तर लक्झरी सेगमेंटमध्येदेखील उत्तम परफॉर्म करत आहे. ज्यांनी ही कार चालवण्याची योजना आखली होती त्यांच्यासाठी या वाहनाचे परत येणे म्हणजे आनंदाची गोष्ट असू शकते. या महिन्याच्या सुरुवातीलाच या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. नवीन Q5 ची किंमत 55 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 60 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाण्याची शक्यता आहे.

ऑडी Q5 एक्सटीरियर स्टायलिंग

नवीन Q5 च्या एक्सटीरीयरमध्ये किरकोळ बदल केले आहेत, विशेषत: उभ्या क्रोम स्लॅट्ससह मोठ्या सिंगल-फ्रेम 8 डिग्री ग्रिलद्वारे हायलाइट केलेले बदल, पुन्हा तयार केलेले एलईडी युनिट्स, 19 इंचांचे अलॉय व्हील आणि अपडेट केलेले एलईडी टेल लाईट्स. बॅक प्रोफाइलदेखील काही प्रमाणात अपडेट केले आहे.

ऑडी Q5 केबिन लेआउट

नवीन ऑडी Q5 मधील सर्वात मोठे बदल म्हणजे स्टँड-अलोन इन्फोटेनमेंट स्क्रीन, ऑल-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, अपडेटेड स्टीयरिंग व्हील, लेदर अपहोल्स्ट्री आणि अॅम्बियंट लायटिंग, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोलसह नवीन डॅशबोर्ड डिझाइन, हिल-होल्ड असिस्ट सारख्या अनेक वैशिष्ट्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

ऑडी Q5 चं इंजिन आणि ट्रान्समिशन

नवीन Audi Q5 मध्ये 2.0 लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन युनिटशी जोडलेले आहे जे 249 bhp पॉवर आणि 370 Nm टॉर्क निर्माण करते. ऑडीच्या क्वाट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह प्रणालीचाही यात समावेश करण्यात आला आहे. ही कार डिझेल व्हेरिएंटमध्ये येणार नाही.

इतर बातम्या

या तीन गाड्यांना मिळालं सर्वात खराब सेफ्टी रेटिंग, क्रॅश टेस्टमध्ये फेल

अपकमिंग सुझुकी ऑल्टोचे स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?

सुझुकीची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, किंमत…

(2021 audi Q5 to be launched in india on 23rd November, check price and features)