या तीन गाड्यांना मिळालं सर्वात खराब सेफ्टी रेटिंग, क्रॅश टेस्टमध्ये फेल

जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात.

या तीन गाड्यांना मिळालं सर्वात खराब सेफ्टी रेटिंग, क्रॅश टेस्टमध्ये फेल
crash test


मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वात वाईट रेटिंगसह येतात. या गाड्यांना NCAP (New Car Assessment Program) कडून खूपच कमी रेटिंग मिळाले आहे. (Hyundai Santro, Maruti celerio, Eeco are Unsafe vehicles in indian market)

मारुती सेलेरियो

Maruti Suzuki celerio ही एक प्रसिद्ध 5-डोर हॅचबॅक कार आहे. ग्लोबल NCAP ने या कारच्या 1019 kg Celerio च्या बेस व्हेरियंटची क्रॅश टेस्ट केली आहे. या वाहनाला ABS किंवा EBD सारखे फीचर्स मिळत नाहीत. चाचणीदरम्यान या कारची 64 किलोमीटर वेगाने चाचणी घेण्यात आली आहे. रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर, या कारला 0 स्टार रेटिंग मिळालं आहे. तसेच लहान मुलांच्या सुरक्षेचा बाबतीतदेखील ही प्रसिद्ध कार काही विशेष करू शकली नाही, या कारला चाइल्ड सेफ्टी रेटिंगमध्ये 1 स्टार स्कोर देण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, कारची किंमत 4.53 लाख ते 5.78 लाख रुपये इतकी आहे.

Hyundai Santro

Hyundai ची Santro कार हे हॅचबॅक वाहन आहे आणि या कारमध्ये सुरक्षेच्या अनेक समस्या आहेत. या कारच्या ड्रायव्हर साइड व्हेरियंटची 2019 मध्ये चाचणी घेण्यात आली होती. 1099 किलो वजनाच्या या वाहनात सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रायव्हर साइड एअरबॅग, SBR, ABS सिस्टम देण्यात आली आहे. यासोबतच त्याची बॉडी शेल इंटरगिटी देखील अस्थिर घोषित करण्यात आली होती. तथापि, या कारला अॅडल्ट आणि चाईल्ड सेफ्टी रेटिंगच्या बाबतीत केवळ 2 स्टार मिळाले आहेत, जे मारुती सुझुकी सेलेरियोपेक्षा चांगले आहे.

मारुती Eeco

मारुतीची 7 सीटर कार मारुती EECO ही एक लोकप्रिय कार आहे, जी अनेक कामांसाठी वापरली जाते. EECO च्या नॉन-एअरबॅग व्हेरिएंटची चाचणी 2016 मध्ये करण्यात आली होती आणि या कारचे वजन 1124 किलो होते. वाहनाच्या कोणत्याही व्हेरिएंटमध्ये कोणतेही सेफ्टी फीचर्स आढळून आले नाहीत. त्याचे बॉडी शेल इंटरगिटी देखील अस्थिर घोषित करण्यात आले. याला अॅडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 0 स्टार आणि कोल्ड सुरक्षा रेटिंगमध्ये 2 स्टार मिळाले आहेत.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Hyundai Santro, Maruti celerio, Eeco are Unsafe vehicles in indian market)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI