AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 Jaguar F-Pace Facelift साठी भारतात बुकिंग सुरु, लवकरच लाँच होणार

जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने भारतात अधिकृतपणे 2021 एफ-पेस फेसलिफ्ट (2021 F-Pace facelift) या कारसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे.

2021 Jaguar F-Pace Facelift साठी भारतात बुकिंग सुरु, लवकरच लाँच होणार
2021 Jaguar F Pace Facelift
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 08, 2021 | 6:59 AM
Share

मुंबई : जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने (JLR) अधिकृतपणे भारतात 2021 एफ-पेस फेसलिफ्ट (2021 F-Pace facelift) या कारसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये जागतिक बाजारात एंट्री केलेल्या अपडेटेड एसयूव्हीमध्ये नवीन बदल करण्यात आले असून त्यात सुधारित एस्टीरियर स्टाईलिंग, नवीन इंटीरियर आणि कनेक्टेड टेक्नोलॉजीचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जेएलआर इंडिया आपल्या नवीन एसयूव्हीसह न्यू जनरेशन 2.0-लीटर Ingenium डिझेल इंजिन सादर करीत आहे. (2021 Jaguar F-Pace Facelift booking started in India, launching soon)

भारतात, नवीन जॅग्वार एफ-पेस देखील टॉप-स्पेक आर-डायनामिक एस ट्रिम (पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनमध्ये) मध्ये देण्यात येईल. या कारचे वितरण मे 2021 पासून सुरू केले जाईल. या घोषणेवर भाष्य करताना, जॅग्वार लँड रोव्हर इंडियाचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी म्हणाले की, “नव्या अवतारात नवीन जॅग्वार एफ-पेसचं स्टँडआउट डिझाईन, आकार, जबरदस्त परफॉरमन्स आणि उत्तम एक्सपीरियन्ससह भारतीयांचं मन जिंकेल.

2021 F-Pace Facelift ‘हे’ बदल केले जाणार

  • 2021 एफ-पेसच्या व्हिज्युअल अपडेट्समध्ये नवीन ग्रिल, नवीन क्लस्टर पॅटर्नसह एलईडी हेडलाइट्स आणि मोठ्या इंटेकसह नवीन फ्रंट बम्परचा समावेष आहे.
  • SUV मध्ये अलॉय व्हील्सचा नवीन सेट, रिफ्रेश एलईडी टेल लाइट्स आणि नवीन रीअर बम्पर देखील मिळेल. दुसरीकडे, केबिनला नव्याने डिझाइन केलेल्या डॅशबोर्डसह अधिक डिटेल्ड अपडेट प्राप्त झाले आहेत.
  • यामध्ये लेटेस्ट जनरेशन पीव्ही प्रो इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह एक मोठा डिस्प्ले मिळेल, जो अनेक कनेक्टेड फीचर्सचा दावा करतो.
  • SUV मध्ये नवीन 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रोटरी डायलची जागा घेणारा एक छोटा शिफ्टर लीव्हर आणि आय-पेस प्रमाणेच टच-सेन्सेटिव्ह बटणांसह नवीन स्टीयरिंग देखील मिळते.
  • जॅग्वार दोन ड्युअल-टोन इंटिरियर ट्रिम ऑप्शन्स ऑफर करत आहे – मार्स रेड आणि सिएना टॅन, ज्यामध्ये सॉफ्ट-टच पॅनेल आहेत, तसेच कीलेस एंट्री आणि 14 स्पीकर मेरीडियन साऊंड सिस्टम सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

शानदार इंजिन

लाँचिंगच्या वेळी इंडिया-स्पेस मॉडेलच्या इंजिनाच्या डिटेल्सचा खुलासा होण्याची शक्यता आहे. नवीन 2.0 लिटर, चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन 243 बीएचपी पॉवर, तर 3.0 लिटर, 6-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल युनिट 330 बीएचपी पॉवर निर्माण करतं. टॉप-स्पेक आर-डायनामिक एस ट्रिममध्ये 390 बीएचपी पॉवर जनरेट करण्यासाठी समान इंजिनचे ट्यून केलेले आहे.

इतर बातम्या

ही जबरदस्त कार 8 लाख रुपये सवलतीत उपलब्ध, कार विकत घेण्याची चांगली संधी

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणार, Hummer EV च्या लूकची चाहत्यांना भुरळ

सिंगल चार्जवर 500KM रेंज, Kia EV6 कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा

(2021 Jaguar F-Pace Facelift booking started in India, launching soon)

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...