AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट, राष्ट्रवादीत फुट, पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला? कुणाचं फिसकटणार गणित…

Someshwar Sugar Factory Baramati: बारामतीमधील वाघाळवाडी येथील सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत इथं फुट पडल्याचा आणि पुरुषोत्तम जगताप हे वेगळा निर्णय घेण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट, राष्ट्रवादीत फुट, पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला? कुणाचं फिसकटणार गणित...
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट, पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला?
| Updated on: Sep 30, 2026 | 12:20 PM
Share

Someshwar Sugar Factory Baramati: बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत इथं फुट पडल्याचा आणि पुरुषोत्तम जगताप हे वेगळी चूल मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामागे अर्थातच एक मोठे कारण समोर आले आहे. आज, 30 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अद्याप प्रमुख राजकीय गटांकडून अंतिम पॅनल जाहीर झालेले नाही. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे भाजपच्या आयोजित मेळाव्यात जात असल्याने चर्चांना पेव फुटले आहेत.

राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र मेळाव्या बोलवल्यानंतर त्याच मेळाव्याला भाजपचे पदाधिकारी उपस्थित लावणार आहेत. पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागले का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. भाजप आणि पुरुषोत्तम जगताप एकत्र मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असेल. आज बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे पुरुषोत्तम जगतापांचा मेळावा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असं जरी असलं तरी अद्यापही एकाही पक्षाने न आपलं पॅनल जाहीर केलेलं नाही. दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांनी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जगताप यांच्या भूमिकेकडे लक्ष

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुरूषोत्तम जगताप यांनी सभासदांचा मेळावा आयोजित केला आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी हा मेळावा असल्याचे सांगण्यात ये आहे. सभासदांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जगताप कोणती भूमिका मांडतात. कोणत्या उमेदवारांना सोबत घेण्याचे संकेत देतात, कोणती रणनीती आखतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र पॅनलच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्याचे समोर आले .तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात उमेदवार निवडीची चाचपणी झाली. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतील की स्वतंत्र पॅनल उभे करतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?