नवं इंजिन आणि दमदार फीचर्ससह Toyota Land Cruiser 300 लाँच, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?

दिग्गज वाहन निर्माता कंपनी टोयोटाने (Toyota) आपली आयकॉनिक एसयूव्ही लँड क्रूझरच्या (SUV Land Cruiser) नेक्स्ट जनरेशन मॉडेलचे अनावरण केले आहे.

नवं इंजिन आणि दमदार फीचर्ससह Toyota Land Cruiser 300 लाँच, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?
2022 Toyota Land Cruiser 300

मुंबई : दिग्गज वाहन निर्माता कंपनी टोयोटाने (Toyota) आपली आयकॉनिक एसयूव्ही लँड क्रूझरच्या (SUV Land Cruiser) नेक्स्ट जनरेशन मॉडेलचे अनावरण केले आहे. कंपनीने LC300 या नावसह ही कार सादर केली आहे. Land Cruiser ची 200 सिरीज 2007 मध्ये सादर करण्यात आली होती आणि आता ती कमी वजन, अधिक शक्ती आणि अधिक वैशिष्ट्यांसह सादर केली गेली आहे. (2022 Toyota Land Cruiser 300 Debuts With Twin-Turbo V6 Engine and New Cabin)

नव्या लँड क्रूझरचे (Land Cruiser) अनावरण संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या एका डिजिटल इव्हेंटमध्ये करण्यात आले आहे. ही कार सुरुवातीला रशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये उपलब्ध केली जाईल. यानंतर Toyota Land Cruiser 300 जगातील निवडक बाजारात दाखल केली जाईल. तथापि, ही कार अमेरिका आणि भारतात कधी दाखल होईल, याबाबत कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही.

Land Cruiser 300 चे फीचर्स

रिपोर्ट्सनुसार, नवीन Land Cruiser 300 टोयोटाच्या TNGA प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे, ज्याला GA-F असे नाव देण्यात आले आहे. यासह V8 इंजिन ट्विन टर्बो V6 नॅचुरली एस्पीरेटेड इंजिनसह रिप्लेस करण्यात आलं आहे. या ऑफ-रोडर एसयूव्हीच्या केबिनमध्ये बरेच बदल केले गेले आहेत आणि त्यामुळे या कारला प्रीमियम लुक मिळाला आहे.

यासह कंपनीने त्यात फिंगरप्रिंट आयडेंटिटी व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजी सादर केली आहे. त्याशिवाय त्याची 9 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम 12.3 इंचाच्या इन्फोटेन्मेंट सिस्टद्वारे अपडेट केली गेली आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले दोन्हीला सपोर्ट करते. याशिवाय यात 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे.

Land Cruiser 300 चं इंजिन

कंपनीने ही SUV दोन इंजिन पर्यायांसह सादर केली आहे. यापैकी पहिले ट्विन-टर्बो V6 3.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 409 एचपी पॉवर आणि 650Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतं. दुसरं 3.3 लीटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात आलं आहे, जे 305 एचपी पॉवर आणि 700Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही दोन्ही इंजिन 10-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडली आहेत.

इतर बातम्या

ठरलं! ‘या’ दिवशी लाँच होणार बहुप्रतीक्षित Hyundai Alcazar, लाँचिंगआधी जाणून घ्या SUV चे फीचर्स

दमदार फीचर्ससह 2021 Skoda Octavia भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(2022 Toyota Land Cruiser 300 Debuts With Twin-Turbo V6 Engine and New Cabin)