अवघ्या 20 मिनिटात MG Astor च्या 5000 युनिट्सची विक्री, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?

MG Astor ची या वर्षातली विक्री पूर्ण झाली आहे. ही विक्री होण्यास केवळ अर्धा तासच लागला. 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग सुरू झाली आहे.

अवघ्या 20 मिनिटात MG Astor च्या 5000 युनिट्सची विक्री, जाणून घ्या SUV मध्ये काय आहे खास?
Mg Astor
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 3:14 PM

मुंबई : MG Astor ची या वर्षातली विक्री पूर्ण झाली आहे. ही विक्री होण्यास केवळ अर्धा तासच लागला. 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग सुरू झाली आहे. एमजी मोटर्सने सांगितले की, आज सकाळी 5000 युनिट्सची विक्री झाली आहे, जी या वर्षाच्या अखेरीस कार उत्पादक कंपनीने विकणे अपेक्षित होते. एस्टर एसयूव्हीच्या पहिल्या बॅचची डिलिव्हरी नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. (5000 MG Astor SUV sold in 20 minutes, know details)

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) नुकताच आपल्या MG Astor कारवरून पडदा हटवला आहे. कंपनीच्या सध्याच्या MG ZS EV ची ही पेट्रोल आवृत्ती आहे. पण कंपनीने त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यामुळे ती देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) वाली कार ठरते. MG Astor मध्ये, कंपनीने पर्सनल AI असिस्टंट दिलं आहे. या कारच्या पर्सनल AI असिस्टंटला पॅरालिम्पिक खेळाडू आणि खेलरत्न दीपा मलिक यांनी आवाज दिला आहे. एसयूव्ही विभागातील ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

MG Astor दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल, ज्यात 1.5 लीटर NA पेट्रोल मोटर (110 PS / 144 Nm) आणि 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल मोटर (140 PS / 220 Nm) यांचा समावेश असेल. पहिल्या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन किंवा 8 स्टेप सीव्हीटी असू शकते, तर नंतरचे 6 स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Astor 1.5L MT एकूण 6 ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध होईल, ज्यात स्टाईल, सुपर, स्मार्ट एसटीडी, स्मार्ट, शार्प एसटीडी आणि शार्प ट्रिम लेव्हल्सचा समावेश असेल.

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कांटे की टक्कर

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंट भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सर्वात स्पर्धात्मक आहे. क्रेटा ते सेल्टॉस आणि कुशक पर्यंत, येथे प्रत्येक वाहनाचा स्वतःचा एक यूएसपी आहे. अशा परिस्थितीत, एमजी मोटर इंडिया अॅस्टरला अद्वितीय वैशिष्ट्यांसह पॉवर-पॅक पर्याय म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

फीचर्स

ग्राहकांना तीन इंटीरियर थीममधून आवडती थीम निवडता येईल. त्यापैकी एक म्हणजे ड्युअल-टोन संगरिया रेड. MG Astor मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा समावेश आहे. इतर स्टँडर्ड फीचर्समध्ये JioSaavn अॅप, आणि MapMyIndia द्वारे मॅप्स आणि नेव्हिगेशन सेवा समाविष्ट आहेत.

एमजी मोटर इंडिया Astor ला हवेशीर फ्रंट सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या सुविधांनी सुसज्ज करण्याची अपेक्षा आहे. एमजी मोटर इंडिया त्याच्या कारमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला पर्सनल असिस्टंट ऑफर करत आहे जे अमेरिकन फर्म स्टार डिझाईनने बनवले आहे. या विभागात पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 टेक्नोलॉजी दिली जात आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(5000 MG Astor SUV sold in 20 minutes, know details)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.