AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Car : पेट्रोल-डिझेल, सीएनजी नाही तर…‘या’वर चालेल मारुतीची नवीन कार

पेट्रोल-डिझेलन अन्‌ सीएनजीनंतर मारुती आता इथेनॉलवर चालनारी कार बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे ही कार चालवणे पेट्रोल कारपेक्षा अधिक स्वस्त असणार आहे. इथेनॉलवर चालणारी कार सर्वसामान्यांना कशी परवडेल, याबाबत या लेखातून माहिती घेणार आहोत.

Maruti Car : पेट्रोल-डिझेल, सीएनजी नाही तर...‘या’वर चालेल मारुतीची नवीन कार
मारुतीची नवीन कारImage Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 27, 2022 | 1:34 PM
Share

पेट्रोल-डिझेल (petrol-diesel)आणि सीएनजीनंतर (CNG) आता मारुती एक फ्यूअल हायब्रिड कार बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. इथेनॉलवर चालणारी ई20 वाहनांना पुढील वर्षी बाजारात आणण्याची तयारी मारुतीकडून सुरु झाली आहे. ई20 वाहन, ही वास्तविक पेट्रोल आणि इथेनॉल असे दोघांवर चालणारी वाहने असतात. सोबत कंपनीचा हाही दावा आहे, की भविष्यात सर्वच कारमध्ये असे इंजीन उपलब्ध राहणार आहेत. या सर्व वाहनांची ट्युनिंग ही इथेनॉल फ्यूअलनुसार सेट करण्यात येणार आहे. इथेनॉलवर (ethanol) आधारीत कारच्या किमतींबाबत बोलायचे झाल्यास ई20 वाहनांच्या किमती इतर वाहनांपेक्षा काहीशा जास्त असण्याची शक्यता आहे.

सध्या मारुती कंपनी पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि फ्लेक्स फ्यूअल पर्यायासोबत इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांवर काम करीत आहे. जाणून घेउया, मारुतीच्या या विविध इथेनॉलवर चालणार्या वाहनांची माहिती,‘कारदेखो’च्या रिपोर्टनुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, कंपनीची पुढील रणनीती ई20 वर चालणार्या वाहनांना अनुसरुन आहे. कंपनीच्या दाव्यानुसार 2023 एप्रिलपर्यंत ई20 वाहने रस्त्यांवर दिसू लागतील. ई20 वाहने म्हणजे अशी वाहने जी 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलपासून बनलेली असतील. पेट्रोल आणि सीएनजीच्या व्यतिरिक्त कार आता तिसर्या पर्यायासोबत दिसून येणार आहे. एक फ्लेक्स फ्यूअल इंजीन हे स्टँडअलोन किंवा मिक्स फ्यूलवरच काम करत असते. सध्या कारमधील इंजीन सेटिंग्स्‌ सोबत 5 ते 10 टक्के इथेनॉलचे मिश्रण वापरण्यात येत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ई20 इंजीनवर चालणारी वाहनांची किंमत ही इतर वाहनांच्या तुलनेत काहीशी जास्त असू शकते.

कशापासून बनते इथेनॉल इंधन

इथेनॉलच्या वापराने इंधनाच्या फ्यूअल इकॉनॉमीमध्ये काहीशी पडझड होण्याची शक्यता असून सरकार ब्लेंडेड फ्यूअलवर कमी कर आकारण्याचे नियोजन करीत आहे. इथेनॉल स्थानिक कच्च्या मालापासून तयार होत असते. यात कुठल्याही आयातीची गुंतागुंत नसते. त्यामुळे या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षा कमी असते. 2025 पर्यंत कारमध्ये ई20 ब्लेंड फ्यूअल इंजीनचा वापर करण्यात यावा, असे सरकारचे नियोजन आहे. आतापर्यंत सर्व कार कंपन्यांमध्ये केवळ मारुतीच ई20 फ्यूअलवर काम करीत असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या :

Mai: ‘माई’मधील साक्षी तंवरच्या ‘या’ सीनची सोशल मीडियावर का होतेय इतकी चर्चा?

Baramati water cut : बारामतीकरांनो, पाणी जपून वापरा! वितरण नलिकेच्या कामामुळे गुरुवार, शुक्रवार पाणी नाही!

Navneet Rana: संजय राऊतांना ॲट्रॉसिटी लावा, नवनीत राणा यांची थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रार, पुन्हा जातीचा उल्लेख

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल