Cars : चार लाखांपेक्षाही कमी किमतीत आहेत ‘या’ तीन कार… सोबत जबरदस्त फिचर्स अन्‌ मायलेज

Cars : चार लाखांपेक्षाही कमी किमतीत आहेत ‘या’ तीन कार... सोबत जबरदस्त फिचर्स अन्‌ मायलेज
चार लाखांपेक्षाही कमी किमतीत आहेत ‘या’ तीन कार
Image Credit source: facebook

जर तुम्हाला चांगला मायलेज असलेली, सोबत आकर्षक व आधुनिक फिचर्स असलेली कार पाहिजे आहे आणि तेही तुमच्या बजेटमध्ये तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे... कारण या लेखात केवळ चार लाखांच्याही खाली किंमत असलेल्या अन्‌ सोबत जबरदस्त मायलेज असलेल्या कारबद्दल माहिती देणार आहोत.

रचना भोंडवे

|

Apr 23, 2022 | 7:35 PM

देशात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये (Automobile sector) गेल्या काही वर्षांमध्ये मोठी क्रांती झालेली आहे. कोरोना काळाच्या तीन वर्षांमध्ये ज्या वेळी सर्व सार्वजनिक दळणवळण (Public transport) सुविधा बंद होत्या त्या वेळी खासगी वाहनांना मोठी मागणी वाढली होती. कोरोना काळातदेखील चारचाकी वाहनांचा बाजार तेजीत बघायला मिळत होता. परंतु सर्वांनाच कार घेणे परवडेल असेही नाही. त्यामुळे अनेक जण कारच्या किंमती पाहूनच तिच्या खरेदीचा विचार सोडून देत असतात. परंतु काही कंपन्यांनी ग्राहकांच्या या समस्या समजून चांगला मायलेज, आकर्षक फिचर्ससह काही बजेट कार्सची निर्मिती केली आहे. या कार्सची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे. आज आम्ही तूमच्या मारुती सुझुकीसह (Maruti Suzuki) अन्य काही कंपन्यांच्या कारची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत चार लाख रुपयांहूनही कमी आहे.

1) मारुती सुझुकी अल्टो

मारुतीची सर्वाधिक खप असलेल्या कारमधील मारुती सुझुकी अल्टो कारचा समावेश होतो. लहान कुटुंबासाठी ही कार एकदम ‘परफेक्ट’ आहे. अल्टोची एक्सशोरुम किंमत केवळ 3.25 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वाधिक प्रसिध्द अशी छोटी कार आहे. शिवाय या कारचा मायलेजदेखील 22.05 ते 31.59 किलोमीटरचा आहे. अल्टो पेट्रोल व सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारला 796 सीसीचे इंजीन देण्यात आले आहे. चार ते पाच जण या कारमध्ये सहज बसू शकतात.

2) मारुती सुझुकी एस-प्रेसो

ही कार भारतात सहा व्हेरिएंट आणि सहा रंगात उपलब्ध आहे. यात पेट्रोल आणि सीएनटी असे दोन्ही व्हेरिएंट येतात. या कारचा मायलेज 21.53 ते 31.19 किलोमीटर आहे. यात 998 सीसीचे इंजीन देण्यात आले आहे. या कारमध्येही चार ते पाच लोक सहज प्रवास करु शकतात. याचे ट्रांसमिशन मेन्युअल आणि ऑटोमॅटीक आहे. या कारची एक्सशोरुम किंमत केवळ 3.85 लाख रुपये आहे.

3) डॅटसन रेडी-गो

डॅटसन रेडी-गो केवळ पेट्रोल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्सशोरुम किंमत 3.98 लाख रुपये आहे. डॅटसन रेडी-गोच्या नवीन व्हेरिएंटमध्ये नवीन बंपर, नवीन हेडलँप, नवीन बोनट, ग्रील आदी देण्यात आले आहे. ही कार पाच विविध व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारचा मायलेज जवळपास 20.17 ते 22 किलोमीटर इतका आहे. 799 ते 999 इंजीनमध्ये ही कार उपलब्ध आहे. यात साधारणत: पाच जण आरामात प्रवास करु शकतात.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें