Navneet Rana: संजय राऊतांना ॲट्रॉसिटी लावा, नवनीत राणा यांची थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रार, पुन्हा जातीचा उल्लेख

Navneet Rana: राऊत यांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

Navneet Rana: संजय राऊतांना ॲट्रॉसिटी लावा, नवनीत राणा यांची थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रार, पुन्हा जातीचा उल्लेख
संजय राऊतांना अॅट्रॉसिटी लावा, नवनीत राणा यांची थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 12:53 PM

नवी दिल्ली: मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर आता खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे. राणा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रारीचं पत्रं दिलं आहे. राऊत यांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. मी चांभार आहे आणि संजय राऊत ओबीसी आहेत. त्याचा दाखला देत त्यांच्याकडून माझी बदनामी झाल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. मी चांभार जातीची असल्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिक मला त्रास देत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. राऊत यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे राऊत यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिकांनी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला राणा दाम्पत्यांनी अटक करून घेण्यास नकार दिला. मात्र, पोलीस या दोघांनाही पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर या दोघांनी राऊत आणि मुख्यमंत्र्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात क्रॉस केस केली. तसेच काही शिवसैनिकांविरोधातही गुन्हा दाखल केला. या प्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली. तर मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटकेनंतर टेबल जामीन देण्यात आला.

जामीन नाही, दिलासा नाही

त्यानंतर राणा दाम्पत्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांच्या जामिनावर येत्या 29 तारखेला सुनावणी करणार असल्याचंही कोर्टाने सांगितलं. तसेच येत्या 27 तारखेपर्यंत सरकारी वकील आणि पोलिसांना त्यांचं लेखी म्हणणं मांडण्यास सांगितलं. सत्र न्यायालयानेही राणा दाम्पत्यांना जामीन न दिल्याने त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

राऊतांकडून सडकून टीका

त्यानंतर राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा उल्लेख करत त्या खोटारड्या असल्याचं म्हटलं होतं. राणा दाम्पत्य 420 असल्याचं राऊत यांनी म्हटल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी राऊतांविरोधात दिल्ली पोलीसांकडे तक्रार अर्ज केला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.