AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raut on Navneet Rana Case: हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा डाव, अंडरवर्ल्डचंही कनेक्शन; राऊतांनी बॉम्ब टाकला

Raut on Navneet Rana Case: संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत राणा दाम्पत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

Raut on Navneet Rana Case: हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा डाव, अंडरवर्ल्डचंही कनेक्शन; राऊतांनी बॉम्ब टाकला
हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा डाव, अंडरवर्ल्डचंही कनेक्शन; राऊतांनी बॉम्ब टाकलाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 12:22 PM
Share

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित युसूफ लकडावालाकडून 80 लाख रुपये घेतल्याचं उघड झालं आहे. त्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राणा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हनुमान चालिसाच्या निमित्ताने मुंबईचं (mumbai) वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. त्यात मला अंडरवर्ल्ड कनेक्शन दिसतंय, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी या प्रकरणाचा थेट 1992-93च्या दंगलीशी संबंधही जोडला आहे. मुंबईत 1992-93ला दंगली झाल्या. त्यात अंडरवर्ल्ड कनेक्शन होतं. पाकिस्तानचं कनेक्शन होतं. डी गँगचं कनेक्शन होतं. माफिया टोळ्या होत्या. मला आता तसंच दिसतंय. सरकारलाही तेच दिसतंय, गेल्या 15 दिवसात जे काही घडलंय त्यावरून पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू असलेलं दिसतंय. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण यामागे डी गँग आणि त्यांचा पैसा काम करतोय असंच दिसतंय, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत राणा दाम्पत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. युसूफ लकडावाला आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहे याचं लहानसं प्रकरण समोर आलं. त्याची चौकशी का झाली नाही? लकडवालाने मनी लॉन्ड्रिंग करून त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला. राणा दाम्पत्य हे एक त्याचे लाभार्थी आहेत. त्यांनी 80 लाख रुपये घेतले. का घेतले? कशासाठी घेतले? आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेल्या आणि डि गॅँगशी संबंधित लकडावालाच्या पैशाचा वापर कुठे झाला? एवढेच पैसे आहेत की अजून आहेत? याचा तपास मुंबईच्या ईओडब्ल्यूने का केला नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे राणांची आणखी प्रकरणं

लकडावालाच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सर्वांची चौकशी होते. तर मग राणा यांची चौकशी का होत नाही? त्या या प्रकरणातून कशा सुटू शकतात? त्यांना वाचवणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यात अस्थिरता करण्याचा प्रयत्न आहे. माझ्याकडे अनेक प्रकरण आली. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ही प्रकरणे दिली आहेत. ते योग्य ठिकाणी देतील, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?