सिंगल चार्जमध्ये 611 किमी रेंज, BMW ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी सज्ज

भारतासह जगभरातील सर्वच प्रमुख वाहन कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहेत. बहुतांश कंपन्यांनी आपापली इलेक्ट्रिक वाहनं बाजारात दाखल केली आहेत. यातच आता लक्झरी कारमेकर कंपनी बीएमडब्ल्यूची भर पडणार आहे.

सिंगल चार्जमध्ये 611 किमी रेंज, BMW ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी सज्ज
BMW iX Electric Car
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 6:00 AM

मुंबई : भारतासह जगभरातील सर्वच प्रमुख वाहन कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहेत. बहुतांश कंपन्यांनी आपापली इलेक्ट्रिक वाहनं बाजारात दाखल केली आहेत. यातच आता लक्झरी कारमेकर कंपनी बीएमडब्ल्यूची भर पडणार आहे. कंपनी आपली इलेक्ट्रिक कार BMW iX लॉन्च करणार आहे. 11 डिसेंबर रोजी लॉन्च होणारी BMW iX CBU मार्गाने भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल. BMW कंपनी iX सह भारतात प्रीमियम इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. (All electric BMW iX India launch on December 11)

BMW iX ऑल-न्यू अॅल्युमिनियम स्पेसफ्रेमवर आधारित आहे आणि आकाराने BMW X5 सारखीच आहे. कार BMW च्या पाचव्या जनरेशनमधील ऑल-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मचा वापर करते, ज्यामध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत. BMW iX इलेक्ट्रिक कार भारतातील Mercedes-Benz EQC आणि Audi e-tron सारख्या SUV ला टक्कर देईल.

फास्ट चार्जर मिळणार

BMW iX मध्ये फास्ट चार्जिंग सिस्टमचा पर्याय मिळेल, जी 195kW पर्यंत DC फास्ट चार्जिंग देते. याच्या मदतीने xDrive 50 व्हेरियंटची बॅटरी केवळ 35 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. दुसरीकडे, DC चार्जर वापरून BMW iX xDrive 40 10 टक्क्यांवरून 80 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 31 मिनिटे लागतात.

ड्रायव्हिंग रेंज क्षमता

BMW iX xDrive 40 व्हेरियंटमध्ये 71 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे ही बॅटरी सिंगल चार्जवर 414 किमी रेंज देते. ड्युअल मोटर्स 322 BHP आणि 630 Nm आउटपुट देते. xDrive 50 व्हेरियंटमध्ये 105.2 kWh बॅटरी पॅक वापरला जातो, जो 611 किमीची रेंज देतो. हे व्हेरिएंट 516 BHP पॉवर आणि 765 Nm टॉर्क जनरेट करते आणि 4.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकतं.

AC वॉलबॉक्स फास्ट चार्जर

BMW IX सोबत 11kW AC वॉलबॉक्स फास्ट चार्जर देखील मिळतो. याद्वारे, xDrive 50 व्हेरियंटची बॅटरी 11 तासांपेक्षा कमी कालावधीत 100 टक्के चार्ज केली जाऊ शकते, तर xDrive 40 व्हेरियंटला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 7.5 तास लागतात.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(All electric BMW iX India launch on December 11)

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.