दमदार इंजिन आणि जबरदस्त फीचर्ससह Aprilia SXR 125 स्कूटर भारतात लाँच, किंमत…

अक्षय चोरगे

|

Updated on: Apr 29, 2021 | 4:01 PM

पियाजिओने (Piaggio) भारतीय बाजारात एप्रिलिया एसएक्सआर 125 (Aprilia SXR 125 maxi-scooter) ही स्कूटर सादर केली आहे.

दमदार इंजिन आणि जबरदस्त फीचर्ससह Aprilia SXR 125 स्कूटर भारतात लाँच, किंमत...
Aprilia SXR 125

पुणे : पियाजिओने (Piaggio) भारतीय बाजारात एप्रिलिया एसएक्सआर 125 (Aprilia SXR 125) ही स्कूटर सादर केली आहे. ही मॅक्सी-स्कूटर भारतात 1.15 लाख रुपये (एक्स-शोरूम, पुणे) या किंमतीत लाँच करण्यात आली आहे. या स्कूटरचं अधिकृत लाँचिंग कंपनीकडून जाहीर केलेलं नसलं तरी कंपनीच्या वेबसाइटवर किंमत अपडेट करण्यात आली आहे. (Aprilia SXR 125 maxi-scooter launched in India at Rs 1.15 lakh)

कंपनीने Aprilia SXR 125 स्कूटरसाठी बुकिंग घेणं सुरु केलं आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि डिलरशिपद्वारे 5000 रुपये ही रिफंडेबल अमाऊंट (परत करण्यायोग्य रक्कम) भरुन तुम्ही ही स्कूटर बुक करू शकता. ही स्कूटर व्हाइट, ब्लू, रेड ब्लॅक अशा चार कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

दमदार इंजिन

पियाजिओची ही नवीन स्कूटर कंपनीच्या लोकप्रिय एसएक्सआर 160 (SXR 160) स्कूटरची छोटी आवृत्ती आहे आणि या स्कूटरची किंमत एसएक्सआर 160 मॉडेलपेक्षा 9,000 रुपयांनी कमी आहे. दोन्ही स्कूटर एकसारखी बॉडी आणि डिझाइनसह येतात परंतु त्यांच्या इंजिनमध्ये फरक आहे. Aprilia SR 125 ही स्कूटर SXR 160 पेक्षा लहान आहे आणि Aprilia SR 125 मध्ये moto-scooter इंजिन देण्यात आलं आहे. या स्कूटरमध्ये 125 सीसी क्षमतेचं सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड, SOHC, थ्री-व्हॅल्यू इंजिन आहे. हे इंजिन 7,600 आरपीएम वर 9.4 बीएचपीची मॅक्सिमम पॉवर आणि 6,250rpm वर 9.2Nm टॉर्क जनरेट करतं.

फीचर्स

नवीन Aprilia SXR 125 स्कूटरचं चेसिस आणि सस्पेंशन किट SXR 160 प्रमाणेच आहे, परंतु त्यात थोडे बदल करण्यात आले आहेत. दुसरीकडे कंपनीने एसएक्सआर 160 मध्ये 14 इंचाचे चाक दिले आहे, तर या स्कूटरमध्ये 12 इंचाचे अ‍ॅलोय व्हील आहे. या व्यतिरिक्त कंपनीने यात काही खास फीचर्स देखील जोडले आहेत, ज्यामुळे ही स्कूटर आणखी दमदार बनते. यात तुम्हाला एलसीडी डॅशबोर्ड, अधिक सीट स्टोरेज, फ्रंट स्टोरेज कंपार्टमेंट, 7 लीटर फ्यूल टँक, यूएसबी चार्जिंग पोर्ट असे फीचर्सदेखील मिळतील.

Street 125 ला टक्कर

ही स्कूटर बाजारात Suzuki Burgman Street 125 ला जोरदार टक्कर देऊ शकते. या स्कूटरच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 84,371 रुपये आणि ब्लूटूथ एनेबल्ड व्हेरिएंटची किंमत 87,871 रुपये इतकी आहे. दोन्ही स्कूटरच्या एक्स शोरुम किंमती पुण्यातील आहेत. ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकतात.

इतर बातम्या

बजाज पल्सर Dagger Edge एडिशन बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

55 हजारांहून कमी किंमतीत Bajaj आणि Hero च्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक, तुमच्यासाठी बेस्ट कोणती?

Two Wheelers च्या विक्रीत ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स, Splendor आणि Activa चा धुमाकूळ

(Aprilia SXR 125 maxi-scooter launched in India at Rs 1.15 lakh)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI