Audi India कडून Audi Q5 साठी बुकिंग सुरू, जाणून घ्या शानदार कारमध्ये काय आहे खास?

जर्मनीतील आलीशान कार निर्माता कंपनी ऑडीने आज भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू 5 साठी बुकिंग सुरू केली आहे. नवी सुधारित क्यू 5 स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल.

Audi India कडून Audi Q5 साठी बुकिंग सुरू, जाणून घ्या शानदार कारमध्ये काय आहे खास?
Audi Q5
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 2:55 PM

मुंबई : जर्मनीतील आलीशान कार निर्माता कंपनी ऑडीने आज भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू 5 साठी बुकिंग सुरू केली आहे. नवी सुधारित क्यू 5 स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल. त्याला इन्फोटेनमेंटचे अफाट पर्याय आणि असिस्टन्स विकल्पांची उत्तम जोड मिळेल. ऑडी क्यू 5 ही आकार, अजोड कामगिरी आणि उपकरण सुसज्जतेच्या परिपूर्ण मिलापासाठी ओळखली जाते. (Audi Q5 booking started in India, know all feature and details)

या अतिशय यशस्वी मॉडेलचे शानदार एक्सटेरिअर डिझाइन तिची Q ओळख तसेच क्वॉट्रो डीएनएला अधोरेखित करते. ऑडी क्यू 2 लाख भारतीय रुपये भरून बूक करता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच ऑडी इंडिया डीलरशीपद्वारेही करता येईल.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंह धिल्लन म्हणाले, “भारतातील ऑडीच्या क्यू परिवारात आम्ही आज ऑडी क्यू 5 ची भर घालत तिची बुकिंगही सुरू केली आहे. 2021 वर्षातील हे आमचे नववे प्रोडक्ट लाँचिंग आहे. यंदाच्या आमच्या प्रगतीसाठी आम्ही अत्यंत आनंदी आहोत. ऑडी क्यू 5 ही आपल्या श्रेणीत अत्याधुनिक वैशिष्ट्ये, आराम आणि व्यवहार्यता यांचा परिपूर्ण संगम आहे. अगदी पहिल्याच नजरेत ऑडी क्यू 5 चे नवे डिझाइन भुरळ घालते. या श्रेणीतील धुरंधर म्हणून आम्ही आमचे स्थान बळकट राखू,असा आम्हाला विश्वास आहे. यासोबतच आम्ही आमच्या सध्याच्या व नव्या ग्राहकांनाही आकर्षित करू शकू.”

शानदार डिझाईन

शानदार डिझाइनसह हे नवी ऑडी क्यू 5 वाहन चालवण्याच्या आपल्या क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह गुणधर्मांसोबत येते, जिला या श्रेणीतील सर्वोत्तम गतिशीलतेचे भरभक्कम पाठबळ आहे. ऑडी क्यू 548.26 सेंटीमीटर (आर 19) 5 डबल स्पोक स्टार स्टाइल अलॉय व्हील्स, ऑडी पार्क असिस्ट, कम्फर्ट की सेन्सर नियंत्रित बूट लिडची उघडझाप, एकमेव ऑडीतच उपलब्ध लाखेपासून निर्मित ब्लॅक पियानो इनलेज, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, बीअँडओ प्रीमियम थ्रीडी साऊंड सिस्टिम आदी वैशिष्ट्ये व सुविधांचा अंतर्भाव आहे.

पॉवरफुल इंजिन

ऑडी क्यू 5 ही चारही चाकांसाठी डॅम्पिंग नियंत्रित सस्पेन्शनने सुसज्ज आहे. आपल्या 2.0 लिटरच्या पॉवरफुल टीएफएसआय इंजिनच्या माध्यमातून ऑडी क्यू 5 प्रभावी ऍक्सिलरेशन आणि चपळता दाखवते. तसेच त्यातील क्वॉट्रो ऑल-ड्राइव्ह यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर अनन्यसाधारण गती आणि दिशात्मक स्थैर्यता आणते. यात सुरक्षितता वाढवण्यासाठी मागील बाजूस 2 एअरबॅग्जच्या समावेशासह एकूण 8 एअरबॅग्जचा समावेश करण्यात आला आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Audi Q5 booking started in India, know all feature and details)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.