2021 Audi Q5 भारतात लाँच, जाणून घ्या नव्या SUV ची किंमत आणि फीचर्स

| Updated on: Nov 24, 2021 | 8:34 PM

ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने नुकतीच आपल्या ऑडी क्यू 5 (2021 Audi Q5) च्या लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू 5 मध्ये कंपनीने अनेके स्पोर्टी फीचर्स दिले आहेत.

2021 Audi Q5 भारतात लाँच, जाणून घ्या नव्या SUV ची किंमत आणि फीचर्स
2021 Audi Q5 SUV
Follow us on

मुंबई : ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने नुकतीच आपल्या ऑडी क्यू 5 (2021 Audi Q5) च्या लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू 5 मध्ये कंपनीने अनेके स्पोर्टी फीचर्स दिले आहेत. तसेच या कारमध्ये इन्फोटेनमेंट आणि असिस्टन्सचेही अनेक पर्याय आहेत. ऑडी क्यू5 तिचे आकारमान, परफॉर्मन्स व इतर डिव्हाईसेस यांच्या अचूक मिलाफासाठी प्रसिद्ध आहे. या अत्यंत यशस्वी मॉडेलच्या डिझाईनमध्ये अपडेट्स देण्यात आले आहेत. (Audi Q5 SUV launched in India, know price and features)

ऑडी क्यू 5 मध्ये, 249 HP पॉवर आणि 370 एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या 2.0 लीटर टीएफएसआय इंजिन देण्यात आलं आहे. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू 5 प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे 58.93 लाख रुपये आणि 63.77 लाख रुपये इतकी आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग धिल्लन या लाँचबद्दल म्हणाले, “आज आम्ही २०२१ मधील आमचे 9 वे उत्पादन बाजारात आणले आहे आणि याहून अधिक आनंदी आम्ही असूच शकत नाही. ऑडी क्यू5 अगदी पूर्वीपासून आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे आणि हे मॉडेलही अशीच कामगिरी करेल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे.

धिल्लन म्हणाले, “2021 हे वर्ष ऑडी इंडियासाठी उत्तम राहिले आहे. आमची विक्री वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यात 100 टक्क्यांहून अधिक वाढली आहे आणि ऑडी क्यू 5 बाजारात आल्यामुळे ही वाढ आणखी पुढे जाईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.

परफॉर्मन्स

  • कारचा वेग केवळ 6.3 सेकंदात शून्यावरून 100 किलोमीटरपर्यंत जातो आणि 237 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने ही कार धावू शकतो.
  • कार डॅम्पिंग नियंत्रणासह अडॉप्टिव सस्पेन्शन देऊ करते.
  • ऑडी ड्राइव्ह सिलेक्टच्या माध्यमातून ड्रायव्हर कंफर्ट, डायनॅमिक, इंडिव्हिज्युअल, ऑटो, एफिशिएन्सी आणि ऑफ-रोड या सहा मोड्समधून एकाची निवड करू शकतो.
  • क्वात्रो फोर-व्हील ड्राइव्ह प्रणालीमुळे आव्हानात्मक रोड्सवर ही कार ड्राईव्हचा चांगला अनुभव देते.

डिझाईन

  • ऑडी क्यू 5 च्या पुढील बाजूला ट्रेडमार्ड सिंगलफ्रेम ग्रिल अष्टकोनी आउटलाइनसह देण्यात आली आहे, ही रचना अधिक सुस्पष्ट आहे आणि यात कडा अधिक स्पष्ट दिसून येतात.
  • ग्रिल व पट्ट्यांना क्रोम गार्निशेस आहेत, तर स्किड प्लेट्स, रूफ रेल्स आणि नवीन फॉगलॅम्प केसिंगला सिल्व्हर अक्सेंट्स देण्यात आले आहेत.
  • 48.26 सेंटीमीटर (आर 19) अलॉय व्हील्स, रॅपअराउंड शोल्डर लाइन, एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि अॅल्युमिनिअम रूफ नेल्स यांच्या माध्यमातून गाडीचे बाह्यरूप अधिक चांगले करण्यात आले आहे.
  • ऑडी क्यू 5 पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये नॅव्हारा ब्ल्यू, आयबिस व्हाइट, मायथोस ब्लॅक, फ्लोरेट सिल्व्हर आणि मॅनहटन ग्रे या रंगांचा समावेश आहे.

इंटीरियर

  • नवीन ऑडी क्यू 5 चं इंटीरियर अॅटलास बेज व ओकापी ब्राउन रंगातील लेदर लेदरेट अपहोल्स्ट्रीने सजवलं आहे, तर इनलेजचे फिनिशिंग पिआनो ब्लॅक रंगात केले आहे.
  • सेन्सॉर-कंट्रोल्ड बूट लिड ऑपरेशन, पार्किंग एड प्लससह पार्क असिस्ट, ड्रायव्हर मेमरीसह पॉवर फ्रण्ट सीट्स तसेच वायरलेस चार्जिंग सुविधेसह ऑडी फोन बॉक्स यांमुळे प्रवास अत्यंत आरामदायी होईल याची निश्चिती होते.

इतर बातम्या

Bharat Vehicle Series: अशी करा मार्क BH मालिकेसाठी नवीन नोंदणी, 15 राज्यांमध्ये सेवा सुरू

15 नव्या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल, जाणून घ्या बसमध्ये काय आहे खास?

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Audi Q5 SUV launched in India, know price and features)