AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 10 रुपयांत चमकवा तुमची बाईक; Bike Polish करण्यासाठी वापरा ही खास ट्रिक, कोणीच नाही सांगणार ही आयडियाची कल्पना

Bike Polish-Toothpaste Shine : दुचाकी चकाचक ठेवण्यासाठी आता चांगलाच खर्च येतो. बाईक वॉशिंगसाठीच 50 ते 70 रुपये लागतात. तर बाईकला शायनिंग आणण्यासाठी अजून खर्च लागतो. साधारणपणे हा खर्च 200 ते 500 रुपयांच्या घरात जातो. पण तुम्ही घरच्या घरी अवघ्या 10 रुपयांत बाईक पॉलिश करू शकता.

केवळ 10 रुपयांत चमकवा तुमची बाईक; Bike Polish करण्यासाठी वापरा ही खास ट्रिक, कोणीच नाही सांगणार ही आयडियाची कल्पना
बाईक चमकवा
| Updated on: Dec 04, 2024 | 4:36 PM
Share

बाईक वेळोवेळी धुतली नाही, तिची काळजी घेतली नाही तर चमक फिक्की होते. बाईकचा लूक डल होतो. काही जण त्यांच्या बाईक, कारची खूप काळजी घेतात. तिची नियमित वॉशिंग करतात. बाईक वॉशिंगसाठीच 50 ते 70 रुपये लागतात. तर बाईकला शायनिंग आणण्यासाठी अजून खर्च लागतो. साधारणपणे हा खर्च 200 ते 500 रुपयांच्या घरात जातो. बाईक पॉलिशिंगसाठी खूप खर्च लागतो. पण तुम्ही घरच्या घरी अवघ्या 10 रुपयांत बाईक पॉलिश करू शकता. ही ट्रिक वापरल्यास तुम्ही घरच्या घरी तुमची बाईक चमकवू शकता. तुम्ही घरी बाईकला पॉलिश करू शकता. चमकवू शकता.

10 रुपयांच्या टुथपेस्टने गायब होतील स्क्रॅच

तुमच्या बाईकला चमकवण्यासाठी 10 रुपयांच्या टुथपेस्टची गरज आहे. पांढर्‍या टुथपेस्टच्या वापराने तुम्ही बाईकच्या बाह्य भागावरील जमलेली धूळ, डाग, हलके स्क्रॅच, रेघा, मळकट पणा हटवू शकता. त्यासाठी तुम्हाला एक नरम कपडा, एक मायक्रोफायबर कपडा, पाणी आणि पांढर्‍या टुथपेस्टची गरज असेल.

सर्वात अगोदर तुम्हाला बाईक ओल्या कपड्याने स्वच्छ करावी लागेल. त्यामुळे या बाईकवरील घाण, धूळ आणि तेलाचे डाग स्वच्छ होतील. त्यानंतर पांढरी टुथपेस्ट कमी असलेल्या ओरखड्यांवर, स्क्रॅचवर, घाण दिसणाऱ्या जागेवर लावा. टुथपेस्ट लावल्यानंतर ओल्या मायक्रोफायबर कपड्याच्या मदतीने गोल-गोल पद्धतीने हळूहळू जोर देऊन पुसा. या प्रक्रियेमुळे स्क्रॅच आणि घाण स्वच्छ होईल. तुमची बाईक चमकदार दिसले. तिला चकाकी येईल.

चांगले पुसल्यानंतर आता एका ओल्या कपडा घेऊन पुन्हा बाईक पुसा. त्यामुळे टुथपेस्ट कुठे राहिली असेल तर ती निघून जाईल. त्यानंतर कोरड्या कपड्याने आता बाईक पुसून काढा. तुमची बाईक चमकून उठेल. सर्व्हिस सेंटरवर जशी बाईक चमकते अगदी तशीच तुमची बाईक घरच्या घरी चमकेल.

या गोष्टीवर ठेवा लक्ष्य

या टुथपेस्टचा वापर केवळ हलक्या ओरखड्यांसाठी आणि धातू आणि प्लास्टिकच्या वरील आवारणावरच करा. जिथे पेंट आहे, तिथे जोऱ्याने रगडू नका. नाहीतर तुमच्या बाईकचा पेंट निघून जाईल. व्हाटनिंग एजेंट असलेल्या टुथपेस्टचा अजिबात वापर करू नका. त्यामुळे तुमच्या बाईकचा रंग उडण्याची शक्यता असते. हा रंग भुरका पडू शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.