AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAT-BMS चिनी एप्समुळे टेन्शन वाढलं, आहे त्या जागेवर EV बंद पाडू शकतात?

गेल्या काही दिवसांपासून ई रिक्षा अचानक बंद पडण्याच्या घटनांनी वेग घेतला आहे. काही तरी बिघाड झाला असावं असं सुरूवातीला वाटलं. पण चिनी एप्समुळे ई रिक्षा जागच्या जागी बंद पाडल्या जात असल्याचं चर्चा रंगली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

BAT-BMS चिनी एप्समुळे टेन्शन वाढलं, आहे त्या जागेवर EV बंद पाडू शकतात?
| Updated on: Jul 03, 2026 | 7:27 PM
Share

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय चांगला मानला गेला. पण गेल्या काही दिवसात एका विचित्र प्रकारामुळे ईव्ही मालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चिनी एपचा वापर करून रस्त्यावर ई-रिक्षा थांबवल्या जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर ई रिक्षा अचानक बंद पडत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे अचानक काय सुरू झालं? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. काही प्रकरणात रस्त्यावरील लोकांनी मोबाईल एप्स किंवा ब्लूटूथद्वारे बॅटरी सिस्टम बंद केल्याचा दावा करण्यात येत आहे.

बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम एप

BAT-BMS सारख्या एप्समधून खरोखरच इलेक्ट्रिक वाहनं बंद करता येतात का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. बॅट-बीएमएस (BAT-BMS) हे शेन्झेन ग्रेनर्जी टेक्नॉलॉजी या चीनी कंपनीने विकसित केलेले बॅटरी व्यवस्थापन प्रणाली ॲप आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर देखरेख ठेवण्याचा हेतू या एपचा आहे. बॅटरी चार्ज, व्होल्टेज, तापमान आणि त्याची स्थिती दाखवण्याचं काम या एपच्या माध्यमातून होतं.

दुसरीकडे, लिथियम बॅटरीमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आहे. जर सिस्टम डिसेबल किंवा प्रोटेक्ट केलं नाही तर फोनशी कनेक्ट करणं सोपं असतं चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हे एप ब्लूटूथच्या माध्यमातून बॅटरशी कनेक्ट होतं. पण फोनची रेंज 10 ते 15च्या आसपास असणं गरजेचं आहे. एकदा कनेक्ट झालं की एपच्या माध्यमातून बॅटरी फंक्शन डिसेबल केलं जाऊ शकतं. त्यामुळे बॅटरीच्या माध्यमातून ई रिक्षाच्या मोटारपर्यत जाणारी पॉवर बंद होते. त्यामुळे रिक्षा जागच्या जागी थांबते, असं चर्चा सोशल मीडियावर आहे.

प्रत्येक ईव्हीत रिमोट कंट्रोल फीचर नसतं

प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनात रिमोट कंट्रोल फिचर्स नसतं. काही गाड्या फक्त मॉनिटरिंग होतात. काही ईव्हीत ठराविक फिचर्स असतात. त्यामुळे BAT-BMS या एपमुळे गाड्या दुरून बंद केल्या जाऊ शकतात याचा ठोस असा पुरावा नाही. दुसरीकडे, काही जण या तंत्राचा वापर करून गैरफायदा घेत असल्याचं बोललं जात आहे. तांत्रिक तज्ज्ञ असल्याचं भासवून बंद पडलेली ई रिक्षा चालू करण्यासाठी चालकाकडून 200 चे 500 रुपये उकलतात. यामुळे एका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

फक्त अधिकृत एप वापरा

सध्याचं गोंधळाचं वातावरण पाहता ईव्ही मालकांनी अधिकृत एप वापरणं गरजेचं आहे. कारण माहिती नसलेले एपचा वापर केला तर त्यातून नुकसान होऊ शकते. इतकंच काय तर पासवर्ड मजबूत ठेवा आणि एप नियमित अपडेट करा. शक्य असल्यास रिमोट एक्सेस बंद करा. इलेक्ट्रिक वाहन वापरतात तंत्रज्ञान जितकं फायदेशीर आहे. तितकी सावधगिरी बाळगणेही महत्त्वाचं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ