AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धमाकेदार ऑफर! 4.15 लाखांची कार अवघ्या 1.67 लाखात खरेदीची संधी

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

धमाकेदार ऑफर! 4.15 लाखांची कार अवघ्या 1.67 लाखात खरेदीची संधी
Maruti Alto 800 Lxi
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 07, 2021 | 8:15 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (Big offer buy Maruti Suzuki Alto 800 Lxi in just rs 167000, know more about it)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

2016 चं पेट्रोल मॉडल

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Alto 800 Lxi या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही एक रिफर्बिश्ड कार असून 2016 चं मॉडल आहे. ही एक पेट्रोल इंजिनवाली कार असून आतापर्यंत 53,362 किलोमीटरपर्यंत धावली आहे.

4 लाखांची कार 1.67 लाखात

या मॉडेलचा रंग व्हाईट असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळेल. या कारची मूळ किंमत 4.14 लाख रुपयांपेक्षा जास्त असून असून ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही ही कार 1.67 लाख रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Alto 800 LXI कार www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.

टेस्ट ड्राईव्ह बुक करा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-ajmer-2016/AXerHbHUNiwKO4z0Jo0L) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.

Maruti Alto 800 चे फीचर्स

मारुती सुझुकीच्या Alto 800 या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796cc चं इंजिन मिळेल. हे इंजिन 6000 आरपीएमवर 47.3bhp पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm टॉर्क जनरेट करते. कारला प्रति लीटर 22.05 किलोमीटरचे मायलेज मिळते आणि या कराची एक्स-शोरूम किंमत 4.14 लाख रुपये इतकी आहे.

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

(सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा. तसेच तुम्ही जर सेकेंड हँड कार खरेदी करत असाल तर सर्वात आधी गाडीचे कागदपत्र, डेटिंग पेटिंग पाहून घ्या, त्यानंतर गाडी चालवून पाहा. तसेच गाडी घेताना सोबत एखाद्या मेकॅनिकला न्या, त्याच्या सल्ल्यानंतरच खरेदीची प्रक्रिया सुरु करा.)

इतर बातम्या

Baleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट

बंपर ऑफर! मारुतीची CNG कार अवघ्या 34 हजारात खरेदीची संधी

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

(Big offer buy Maruti Suzuki Alto 800 Lxi in just rs 167000, know more about it)

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...