Baleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट

तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण Maruti Suzuki त्यांच्या कारवर बंपर सवलत देत आहे.

Baleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट
Maruti Suzuki NEXA S-Cross

मुंबई : जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी त्यांच्या कारवर बंपर सवलत देत आहे. ज्यामध्ये तुम्ही मारुती नेक्सा (Maruti Nexa) कार 50 हजार रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. यात तुम्ही Baleno, Ignis, XL6, S-Cross आणि Ciaz सारख्या गाड्या बंपर सवलतीत खरेदी करू शकता. (Get Maruti Suzuki Nexa car with bumper discount of 50000 Rs, know details of offer)

Maruti NEXA Baleno वर बंपर डिस्काउंट – यामध्ये तुम्हाला Baleno च्या Sigma आणि Delta व्हेरिएंटवर 28 हजार रुपयांची सवलत मिळेल, ज्यात 15 हजार रुपयांची रोख सवलत, 10 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

Baleno च्या Zeta आणि Alfa व्हेरिएंटवर डिस्काऊंट

Maruti Suzuki NEXA Baleno च्या Zeta आणि Alfa व्हेरिएंटवर 18 हजार रुपयांचा डिस्काऊंट देय़ण्यात आला आहे. ज्यामध्ये 5 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस 3 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. सोबतच CVT व्हेरिएंटवर 10 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

NEXA Ciaz 30 हजारांचा डिस्काऊंट

Maruti Suzuki NEXA Ciaz वर एकूण 30,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल, ज्यामध्ये 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

NEXA S-Cross च्या SIGMA व्हेरिएंटवर 50,000 रुपयांची सूट

Maruti Suzuki NEXA S-Cross च्या SIGMA व्हेरिएंटवर 50,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. तसेच याच्या अन्य व्हेरिएंट्सवर 35 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ज्यामध्ये 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

इतर बातम्या

Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव, 1 ऑक्टोबरपासून लागू होणारे नियम काय?

(Get Maruti Suzuki Nexa car with bumper discount of 50000 Rs, know details of offer)