50,000 रुपयात खरेदी करा जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स

| Updated on: Apr 01, 2021 | 7:53 AM

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे.

50,000 रुपयात खरेदी करा जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स
Bird ES1+ Electric Scooter
Follow us on

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार/बाईक कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, भारतात आता 50,000 रुपये इतक्या किंमतीसह एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. (Bird ES1+ Electric Scooter Likely To launch in 2021 with Rs 50k price)

गेल्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये ग्राहकांनी आगामी इलेक्ट्रिक वाहनांची झलक पाहिली होती, विशेषत: दुचाकी विभागात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच केली जाणार आहेत. परंतु यातील काही मोजक्याच ऑटोमेकर्सनी त्यांची इलेक्ट्रिक वाहनं लाँच केली आहेत. या ऑटो एक्सपोमध्ये अनेक नवीन स्टार्टअप कंपन्या आल्या ज्या भारतीय वाहन उद्योगात स्थान मिळवू इच्छितात. त्यापैकी बर्ड इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी बर्ड ग्रुपने आपली इलेक्ट्रिक लाइटवेट स्कूटर ईएस 1 + सादर केली होती. परंतु ऑटो एक्सपोनंतर या स्कूटरचे काहीच अपडेट झाले नव्हते, परंतु आता या कंपनीने जाहीर केले आहे की, ते त्यांची ES1+ ही इलेक्ट्रिक स्कूटर 50,000 रुपये इतक्या किंमतीत लाँच करण्याची तयारी करत आहे.

ऑस्ट्रेलियन कंपनीसोबत करार

दरम्यान, नवी अपडेट अशी आहे की, कंपनीने एक सामंजस्य करार केला आहे. कंपनीने ऑस्ट्रेलियन ई-मोबिलिटी फर्म VMoto सह सामंजस्य करार केला आहे, ज्यामध्ये कंपनीला व्हीमोटोमध्ये खास विक्री व विपणन अधिकार मिळतील. व्हीमोटो आधीपासूनच SuperSoco अंतर्गत इलेक्ट्रिक टू व्हिलर रीटेल करते. ज्यात TSX, TS, CPx, CUx चा समावेशी आहे. कंपनी लवकरच आपली एंट्री लेव्हल ई-स्कूटर लॉन्च करू शकते, जी CUMini ई स्कूटर आहे.

डिझाईन आणि फीचर्स

ES1+ मध्ये शार्प एलईडी हँडलॅम्प्स आणि एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रीमियम सेट ऑफ स्विच गिअर मिळू शकतात. यामध्ये तुम्हाला स्प्लिट सीट लेआउट आणि एलईडी टेललाईट मिळेल. या स्कूटरच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना त्यात 3Ah लिथियम आयन बॅटरी पॅक मिळू शकेल जी 1.6kW इलेक्ट्रिक मोटरसह येईल. ही ई-स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 55 किमीपर्यंत धावेल. तसेच ही स्कूटर जास्तीत जास्त 45 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते.

कधी लाँच होणार?

या इलेक्ट्रिक स्कूटरला 12 इंचांचे अ‍ॅलोय व्हील्स देण्यात येतील. या स्कूटरचे वजन 62 किलो असेल. हार्डवेअरच्या बाबतीत, या स्कूटरच्या फ्रंटला टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन स्प्रिंग शॉक अब्जॉर्बर दिले जातील. ही स्कूटर 2021 वर्षाच्या मध्यावर लाँच केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक बाईक चालवणं 11 झाडं लावण्याच्या तुल्यबळ, दिल्ली सरकारचं आवाहन

अलीबाबाने सादर केली एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक, सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटर धावणार

‘ही’ आहे जगातली सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक! प्रति किमी फक्त 20 पैसे खर्च, वाचा धमाकेदार फिचर्स

(Bird ES1+ Electric Scooter Likely To launch in 2021 with Rs 50k price)