इलेक्ट्रिक बाईक चालवणं 11 झाडं लावण्याच्या तुल्यबळ, दिल्ली सरकारचं आवाहन

इलेक्ट्रिक बाईक चालवणं 11 झाडं लावण्याच्या तुल्यबळ, दिल्ली सरकारचं आवाहन
electric-car

केजरीवाल सरकारने स्विच दिल्ली अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अक्षय चोरगे

|

Mar 31, 2021 | 12:54 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Delhi Govt says Leave petrol bike and ride e bike equivalent to planting 11 trees)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार/बाईक कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान देशातील अनेक राज्य सरकारंदेखील ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देत आहेत. दिल्ली सरकार त्यात सर्वात पुढे आहे.

दिल्लीचे सरकारचे म्हणणे आहे की, नागरिकांनी त्यांची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केली तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत ते दरवर्षी 22,000 रुपयांची बचत करु शकतात. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 हजार रुपयांची बचत करु शकतात. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.

इलेक्ट्रिक बाईक चालवणं 11 झाडं लावण्याच्या तुल्यबळ

दिल्ली सरकारने म्हटले आहे की, “टू-व्हीलर सेगमेंटसह आम्ही ‘स्विच दिल्ली अभियाना’ची सुरुवात केली आहे. ग्राहकांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त महत्त्वपूर्ण पर्यावरणीय लाभांचादेखील यामध्ये समावेश आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या एका दुचाकी वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सरासरी 1.98 टन कमी कार्बन उत्सर्जन करेल. 11 झाडं लावल्यानंतरच हे शक्य होतं.” याचाच अर्थ तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल तर 11 झाडं लावल्यानंतर पर्यावरणाचा जितका फायदा होतो, तितकी पर्यावरणाची मदत तुम्ही करु शकाल

दिल्लीत 500 चार्जर पॉईंट उभारणार

दिल्ली सरकारने देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्‍हीकल (ईव्ही) चार्जिंगसाठीचं टेंडर जारी केलं आहे (निविदा काढल्या आहेत). ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले होते की, दिल्ली सरकारकडून देशातील सर्वात मोठ्या ईव्ही चार्जिंगसाठीचं टेंडर कारण्यात आलं आहे. याद्वारे दिल्लीत 100 ठिकाणी तब्बल 500 चार्जर पॉईंट उभारले जाणार आहेत. त्यासाठी नाममात्र शुल्क भरावं लागणार आहे. चार्जिंगसाठी 4 किंवा 5 रुपये प्रति युनिट शुल्क आकारलं जाईल.

जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न : केजरीवाल

दिल्ली सरकारने थेट लोकांशी संपर्क साधण्यासाठी ‘स्विच दिल्ली अभियान’ सुरु केलं आहे. याच नावाने दिल्ली सरकारने सोशल मीडिया हँडलही सुरु केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही दिवसांपूर्वी म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन जागरुकता अभियान एका जनआंदोलनात बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे संवाद व विकास आयोग (डीडीसी) ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन आणि इंस्टाग्रामवर या मोहिमेसाठी सोशल मीडियाचे नेतृत्व करणार आहे.

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त…

Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री

(Delhi Govt says Leave petrol bike and ride e bike equivalent to planting 11 trees)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें