बाईकप्रेमींसाठी खुशखबर, पुढच्या वर्षी बाजारात येणार ही शानदार बाईक, कंपनीकडून बुकिंग सुरु

ब्रिटीश मोटारसायकलची ब्रँड नॉर्टन मोटरसायकलने (Norton Atlas) स्क्रॅम्बलर्सच्या नॉर्टन अ‌ॅटलस श्रेणीसाठी संभाव्य ग्राहकांकडून अभिप्राय मागवला आहे.

बाईकप्रेमींसाठी खुशखबर, पुढच्या वर्षी बाजारात येणार ही शानदार बाईक, कंपनीकडून बुकिंग सुरु
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 7:10 PM

नवी दिल्ली : ब्रिटीश मोटारसायकलची ब्रँड नॉर्टन मोटरसायकलने (Norton Atlas) (जी आता टीव्हीएस मोटर कंपनीच्या मालकीची आहे) स्क्रॅम्बलर्सच्या नॉर्टन अ‌ॅटलस श्रेणीसाठी संभाव्य ग्राहकांकडून अभिप्राय मागवला आहे. नॉर्टन अ‌ॅटलस नोमॅड (Norton Atlas Nomad) आणि नॉर्टन ‌अ‌ॅटलास रेंजरचं (Norton Atlas Ranger) उत्पादन 2021 मध्ये सुरु होणार आहे. बाईकप्रेमींसाठी ही मोठी खुशखबर आहे. (british bike Brand Norton Motorcycles launch northan Atlas Range of Scramblers)

नॉर्टन ‌अ‌ॅटलस स्क्रॅम्बलर्सची पहिल्यांदा 2018 मध्ये घोषणा झाली होती आणि तिला 2019 मध्ये व्यावसायिकरित्या बनवलं जाणार होतं. परंतु नॉर्टन अ‌ॅटलसच्या आर्थिक अडचणींमुळे तिच्या उत्पादनाला अधिक वेळ लागला आहे. आता नवीन कंपनी आणि नवीन सीईओंच्या साथीने कंपनीने अॅटलास रेंजचे पूर्ण उत्पादन करण्याचा निर्धार केला आहे.

नॉर्टन अ‌ॅटलस नोमॅड आणि नॉर्टन अ‌ॅटलास रेंजर दोन्ही वेगवेगळ्या ट्रिम, उपकरणांबरोबर तिचं सामान्य इंजिन असणार आहे. दोन्ही नॉर्टन अ‌ॅटलस 650 मॉडेल तसंच 250 डिग्री फायरिंग डिफरन्ससह दोन्ही बाईकना 650 सीसी इंजिन असेल. हे ट्विन इंजिन 11 हजार आरपीएमवर 84 VHP पॉवरसह 64 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

अ‌ॅटलास रेंजरला ग्राऊंड क्लिअरन्सबरोबर लॉन्ग सस्पेन्शन, रुंद हँडलबारचा एक संच मिळणार आहे. रेंजरच्या सीटची उंची 875 मिमी असेल तर नोमॅडच्या सीटची उंची 824 मिमी असणार आहे. दोन्ही बाईकचं वजन जवळपास 180 किलोग्रॅम असणे अपेक्षित आहे.

2021 मध्ये या बाईकचं लॉन्चिंग केलं जाईल, अशी चर्चा आहे. पण 2021 मध्ये कधी लाँच करणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. किंबहुना 2021 साठी फक्त एकच महिना बाकी राहिलेला आहे. अशातच नॉर्टनने बाईकसाठी ग्राहकांचे बुकिंग आतापासूनच सुरू केले आहे. रिझर्वेशनची घोषणा केली आहे. 650 सीसी अ‌ॅटलस स्कॅम्बलर्स 2021 मध्ये कधीही बाजारात येऊ शकते.

संबंधित बातम्या

Honda H’ness CB 350 ला भारतीय ग्राहकांची पसंती, 20 दिवसात 1000 बाईक्सची विक्री

हिरो मोटोकॉर्प भारतात हार्ले डेव्हिडसनच्या बाईक विकणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.