.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honda H’ness CB 350 ला भारतीय ग्राहकांची पसंती, 20 दिवसात 1000 बाईक्सची विक्री

होंडाने त्यांची बाईक एच नेस-सीबी 350 (H’Ness CB 350) बाईक गेल्या महिन्यात लाँच केली. या बाईकला भारतीय ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Honda H’ness CB 350 ला भारतीय ग्राहकांची पसंती, 20 दिवसात 1000 बाईक्सची विक्री
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 16, 2020 | 11:46 PM
Share

मुंबई : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (Honda Motorcycles And Scooter India) नुकतीच भारतात मिड साइज 350-500 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. त्यासाठी होंडाने त्यांची बाईक एच नेस-सीबी 350 (H’Ness CB 350) गेल्या महिन्यात लाँच केली. या बाईकच्या DLX व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे. या बाईकला भारतीय ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Honda Delivers 1000 units of H’ness CB350 in 20 days; Check price and features)

कंपनीने तीन आठवड्यांपूर्वी या बाईकच्या डिलीवरीला सुरुवात केली. या तीन आठवड्यांमध्ये होंडाच्या या नव्या रेट्रो क्रूजरच्या 1,000 युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. कंपनीने भारतात रॉयल एनफिल्डच्या प्रिमियम मोटारसायकल सेगमेंटमध्ये ही बाईक सादर केली होती. या बाईकला भारतीय ग्राहकांकडून अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 20 दिवसात 1000 बाईक्सची विक्री करुन कंपनीने नवी रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

Honda H’ness CB 350 ही बाईक रॉयल एनफील्ड Meteor 350 आणि Jawa मोटारसायकल्सच्या स्पर्धेत उतरी आहे. या बाईकची किंमत 1.85 लाख ते 1.90 लाख रुपयांपर्यंत आहे.

एच नेस-सीबी 350 या बाईकमध्ये एक 350 सीसीचं पॉवरफुल 4 स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि 15 लीटरचा फ्युल टॅन्क आहे.

होंडाच्या सीबी ब्रॅण्डचा (सिरीजचा) एक मोठा इतिहास आहे. 1952 मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली होती. सीबी 92 ही या सिरीजमधली पहिली बाईक होती. एच नेस-सीबी 350 ही बाईक हा इतिहास पुढे नेणार आहे. भारतीय बाजारात ही रेट्रो स्टाईल बाईक होंडाच्या बिगविंग नेटवर्कद्वारे विकली जाणार आहे.

अवघ्या एक रुपयात बाईक घरी न्या!

केवळ एक रुपया भरुन हिरो मोटो कॉर्प, होंडा, टीव्हीएससारख्या कंपन्यांच्या बाईक घरी नेता येतील. फेडरल बँकेने देशभरात 947 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे या बाईक खरेदी करण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्ड Meteor 350 सोबत ‘या’ 6 दमदार अॅक्सेसरीज मिळणार!

(Honda Delivers 1000 units of H’ness CB350 in 20 days; Check price and features)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर