AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! 4 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 2.15 लाख रुपयांमध्ये खरेदी करा

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! 4 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 2.15 लाख रुपयांमध्ये खरेदी करा
Maruti Alto 800 Lxi
| Updated on: Feb 24, 2021 | 4:33 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 LXI in just rs 215000 know more about it)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

4 लाखांची कार 2.15 लाखात

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या Alto 800 LXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही सेकेंड हँड कार www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर 2.15 लाख रुपयांमध्ये विकली जात आहे. या कारची ऑन रोड किंमत 4.14 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कंपनीची टॉप सेलिंग कार आहे.

2015 चं पेट्रोल मॉडल

ही Maruti Suzuki Alto 800 LXI कार 2015 चं मॉडल आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही कार 69,627 KM इतकी धावली आहे. ही एक फर्स्ट ओनर कार असून यामध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड कार

ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू सर्टिफाईड कार आहे आणि वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही कार मारुती सुझुकीच्या ओरिजनल पार्ट्सचा वापर करुन रिफर्बिश्ड करण्यात आली आहे. ही कार खरेदी केल्यास तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटी आणि तीन फ्री सर्व्हिस सुविधादेखील मिळतील.

टेस्ट ड्राईव्ह बुक करा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/alto-800-in-new-delhi-2015/AXe6Pm4ZZPsTbFxud9WI) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

हेही वाचा

जुनी अल्टो कार खरेदी करण्याचा विचार करताय? मग, इथे मिळेल स्वस्त आणि मस्त डील!

‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, किंमत 5 लाखांहून कमी

कार घेण्याचा विचार करताय? 4 लाखांपेक्षा कमी किमतीत हे जबरदस्त पर्याय

(bumper offer buy Maruti Suzuki Alto 800 LXI in just rs 215000 know more about it)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.