धमाकेदार ऑफर! 5 लाखांची कार 1.25 लाख रुपयात

धमाकेदार ऑफर! 5 लाखांची कार 1.25 लाख रुपयात

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अक्षय चोरगे

|

Feb 15, 2021 | 11:48 AM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (buy second hand maruti Swift Dzire VXI in just rs 125000 from true value)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. तसेच तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत. तुम्ही marutisuzukitruevalue.com या संकेतस्थळावर जाऊन खूपच कमी किंमतीत सेकेंड हँड वाहनं खरेदी करु शकता. ही वाहनं अधिकृत डिलर्सद्वारे विकली जातात.

अवघ्या 1.25 लाख रुपयांमध्ये Swift Dzire घरी न्या

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर अनेक गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट डील घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्ही 1.25 लाख रुपयांमध्ये सेकेंड हँड स्विफ्ट डिझायर Swift Dzire ही कार खरेदी करु शकता. या कारची मूळ किंमत 5.21 लाख रुपये इतकी आहे.

ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या कारची नोंदणी नवी दिल्लीत करण्यात आली आहे. हे 2009 चं मॉडल आहे. या कारचा रंग व्हाईट आहे. तसेच यामध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तसेच ही फर्स्ट ओनर कार आहे. ही कार आतापर्यंत 1,45,863 किलोमीटर धावली आहे. सोबत वेबसाईटवर डीलरची माहिती देण्यात आली आहे.

EMI आणि टेस्ट ड्राइव्हची सुविधा

जर तुम्हाला ही Swift Dzire VXI कार खरेदी करायची असेल तर या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/swift-dzire-in-new-delhi-2009/AXebPM0mNiwKO4z0JoWd) जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तसेच या साईटवर त्या कारचे फोटोदेखील देण्यात आले आहेत. सोबतच तुम्ही तुमच्या हिशेबाने EMI ची सुविधादेखील वापरू शकता. तसेच तुमची माहिती देऊन टेस्ट ड्राईव्ह बुक करु शकता.

हेही वाचा

उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य, टॅग नसेल तर दुप्पट टोल लागणार

नवं डिझाईन, अधिक स्पेस, Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात

Maruti Suzuki च्या उत्पादनात घट, प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठं नुकसान

इलेक्ट्रिक बाईक-स्कूटर वापरा, वर्षाला 22 हजार रुपये वाचवा; सरकारचा मास्टर प्लॅन

(buy second hand maruti Swift Dzire VXI in just rs 125000 from true value)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें