मायलेज जास्त, किंमत कमी, ‘या’ ऑटोमॅटिक गाड्यांना सर्वाधिक पसंती

| Updated on: May 27, 2021 | 7:46 PM

आज आम्ही तुम्हाला चांगलं मायलेज, दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या आणि कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या गाड्यांबाबत माहिती देणार आहोत.

मायलेज जास्त, किंमत कमी, या ऑटोमॅटिक गाड्यांना सर्वाधिक पसंती
Maruti S-Presso,Renault Kwid,Datsun redi-Go
Follow us on

मुंबई : तुम्ही जर स्वत: साठी एक छान कार शोधत असाल ज्यामध्ये आपल्याला जबरदस्त ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स मिळेल, तसेच ती कार चांगलं मायलेज देईल आणि कारची किंमत देखील कमी असेल. प्रत्येकजण अशा कारच्या शोधात असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चांगलं मायलेज, दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या आणि कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या गाड्यांबाबत माहिती देणार आहोत. तसेच या गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशनदेखील मिळेल आणि त्याचबरोबर तुमची वारंवार गिअर्स बदलण्याच्या त्रासातून सुटका होईल. (cheapest automatic cars in India with starting price of rs 5 lakhs and mileage of 22 KM per litre)

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार मॅन्युअल ट्रान्समिशनवाल्या गाड्यांपेक्षा अधिक महाग असतात, परंतु बाजारात अशा अनेक कार आहेत ज्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा आहे, त्याचबरोबर त्या कार स्वस्त आहेत. चला तर मग भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या अशा तीन कार्सबद्दल जाणून घेऊयात.

Maruti S-Presso (मारुती सुझुकी एस-प्रेसो)

ही कार हारटेक्ट प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे, त्यामुळे या कारचं वजन खूपच कमी आहे. या गाडीची एक्स-शोरुम 4.90 लाख रुपये से लेकर 5.06 लाख रुपयांदरम्यान आहे. Maruti S-Presso ही चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Standard, LXI, VXI आणि VXI+ यांचा समावेश आहे. या गाडीत 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती एस-प्रेसोचा फ्रंट लूक खूप बोल्ड आहे. यामध्ये हाय बोनट लाईन, क्रोम ग्रील आणि मोठे हॅलोजन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. एलईडी डीआरएल हेडलाईटच्या खाली आहे. फ्रंट आणि रिअर बंपर मोठा आहे. मारुतीची ही लहान कार 6 रंगात उपलब्ध आहे. यामध्ये 1.0 लीटर इंजिन देण्यात आलं आहे जे 67bhp पॉवर आणि 90Nm टॉर्क देतं. ही कार 21.7 किलोमीटर प्रतिलीटर इतकं मायलेज देते.

Datsun redi-Go (डॅट्सन रेडी गो)

भारतीय बाजारपेठेमध्ये डॅटसन रेडी-गो कारची (Datsun Redi-Go) किंमत 4.95 लाख लाख रुपये इतकी आहे. डॅटसन रेडी-गो भारतीय बाजारात 0.8- लीटर आणि 1- लिटर इंजिनमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या कारचे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएम वर 54 पीएस पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 एनएम टॉर्क तयार करते.

रेडी-गो या कारचे 1 लीटर इंजिन 5500 आरपीएम वर 68 पीएस पॉवर आणि 4250 आरपीएम वर 91 एनएम टॉर्क तयार करते. त्याचे इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. 0.8-लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे. त्याच वेळी, त्याचे 1-लिटर इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

Renault Kwid (रेनॉ क्विड)

रेनॉ क्विड बीएस 6 ही एक एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. क्विडच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. इंजिन 5 स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) गियरबॉक्ससह देण्यात आले आहे. Renault Kwid BS6 या कारची सुरुवातीची किंमत 4.80 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी आहे. ही कार 1 लीटर पेट्रोलमध्ये 22 किलोमीटरचं मायलेज देते.

रेनॉच्या क्विड RXL ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये फुल व्हील कवर, इन्टर्नली अॅडजस्टेबल ORVM, एसी, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळणार आहे. तसेच यात 12V फ्रंट पॉवर सॉकेट, रेडियो आणि एमपी3 सोबत सिंगल डिन स्टीरियो, हँड्स-फ्री टेलिफोन आणि ऑडियो स्ट्रीमिंग साठी ब्लूटूथ, थिएटर डिमिंगसोबत केबिन लाइट, ट्रॅफिक असिस्टन्स मोड आणि फ्रंट स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

2021 Force Gurkha : दमदार ऑफ रोडर SUV लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फीचर्स

PHOTO | Bumper Discount | Datsun वाहनांवर मिळवा 40 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Maruti Suzuki 3 नव्या SUV लाँच करणार, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट कार कोणती?

(cheapest automatic cars in India with starting price of rs 5 lakhs and mileage of 22 KM per litre)