Ducati Multistrada V4 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, बुकिंग्स सुरु

डुकाटी इंडियाने (Ducati India) शुक्रवारी बहुप्रतिक्षित 2021 मल्टीस्ट्राडा व्ही 4 (Ducati Multistrada V4) मोटरसायकलचे बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली.

Ducati Multistrada V4 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, बुकिंग्स सुरु
Ducati Multistrada V4

मुंबई : डुकाटी इंडियाने (Ducati India) शुक्रवारी बहुप्रतिक्षित 2021 मल्टीस्ट्राडा व्ही 4 (Ducati Multistrada V4) मोटरसायकलचे बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. इच्छुक ग्राहक 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेमध्ये आपली बाईक आरक्षित ठेवू शकतात. कंपनीने असे सूचित केले आहे की, मोटारसायकल मर्यादित संख्येने उपलब्ध होईल. जर तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला थोडी घाई करावी लागेल. कारण मर्यादित स्टॉक असल्याने आधी बुकिंग करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. (Ducati Multistrada V4 motorcycle ready to launch in India, pre bookings started)

नवीन मल्टीस्ट्राडा व्ही 4 ची डिलिव्हरी लॉन्चिंगनंतर लवकरच सुरू होईल आणि बाईक सर्व डुकाटी डीलरशिपमध्ये उपलब्ध होईल. नवीन मोटरसायकलची टेस्ट राइडदेखील विक्री सुरू झाल्यानंतर लवकरच सुरू होईल. मल्टीस्ट्राडा व्ही 4 क्षमता आणि टेक्निकल डेव्हलपमेंट्सच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे नवीन मोटरसायकल म्हणून उभी आहे. कंपनीच्या भारतीय लाइनअपमध्ये या बाईकला नवीन फ्लॅगशिप अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकल म्हणून स्थान असेल.

या बाइकमध्ये फ्रंट आणि रिअर रायडर असिस्टन्स रडार-सिस्टिम, कंपनीची नेक्स्ट-जनरेशन डुकाटी कनेक्ट मिररिंग सिस्टिम असे लेटेस्ट फीचर्स मिळतील. बाइकमध्ये ऑल-न्यू व्ही-4 ग्रांटुरिस्मो इंजिनचा वापर करण्यात आला आहे. बाइकच्या फीचर्सबाबतची अन्य माहिती लाँचिंगवेळीच सादर केली जाईल, दिसायला अत्यंत स्टायलिश असलेल्या या बाइकमध्ये रायडरला चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळावा यासाठी हायटेक फीचर्स दिले जातील.

डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्र म्हणाले की, “जागतिक घोषणा झाल्यापासून मल्टीस्ट्राडा व्ही 4 (Multistrada V4) साठी अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. यात जगातील पहिलीच फ्रंट आणि रियर रडार हेल्प, प्रगत डिजिटल डॅशबोर्ड, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या बाईकमधील सर्वात मोठा बदल म्हणजे त्याला डेस्मोसेडिसी स्ट्रॅडेलसह सज्ज असलेले ऑल-न्यू व्ही 4 ग्रांटुरिस्मो इंजिन देण्यात आले आहे. यासह, मल्टीस्ट्राडा व्ही 4 मध्ये अनेक कमालीचे फीचर्सदेखील उपलब्ध होणार आहेत.

इतर बातम्या

OLA इलेक्ट्रिक स्कूटरचा लाँचिंगआधीच बाजारात धुमाकूळ, 24 तासात 1 लाख बुकिंग्सचा टप्पा पार

31 ऑगस्टपर्यंत स्वस्त बाईक खरेदी करण्याची संधी, केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचरच्या किंमतीत 25000 रुपये कपात

फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर

(Ducati Multistrada V4 motorcycle ready to launch in India, pre bookings started)