सिंगल चार्जवर 139 किमी रेंज, Okinawa ची इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube, Ather 450X, Bajaj Chetak ला देणार टक्कर

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेले नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

सिंगल चार्जवर 139 किमी रेंज, Okinawa ची इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube, Ather 450X, Bajaj Chetak ला देणार टक्कर
Okinawa Praise+

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 110 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचा मोर्चा इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळवला आहे. (Electric scooter Okinawa Praise+ can give 139KM Range in single charge, will compete with TVS iQube, Ather 450X, Bajaj Chetak)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेले नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, भारतात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर्स, इलेक्ट्रिक बाईक्स आणि कार्स उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणार आहोत, जी सिंगल चार्जवर 139 किमीची रेंज देते. ओकिनावा असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. ही एक लो बजेट स्कूटर आहे. ओकिनावाची ही स्कूटर रेंजच्या बाबतीत TVS iQube, Ather 450X, Ola S-1 आणि बजाज चेतक सारख्या स्कूटरला जोरदार टक्कर देईल.

Okinawa iPraise+ ची खासियत

Okinawa Praise चे अपग्रेड मॉडेल Okinawa Praise+ आहे. या स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये अनेक चांगले फीचर्स उपलब्ध आहेत. यात एक डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरी आहे, जी तुम्ही स्कूटरमधून काढून वेगळी ठेवू शकता, घरात नेऊन चार्ज करू शकता. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 2-3 तासात पूर्ण चार्ज होते. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 160-180 किमीची रेंज देऊ शकते.

Okinawa Praise+ ची बॅटरी

या ओकिनावा स्कूटरमध्ये 1000W मोटर आहे, जी 3.3 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे पॉवर्ड आहे. यात ट्यूबलेस टायर्स मिळतात. तसेच या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आहे. तसेच, समोर आणि मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. याच्या सस्पेन्शबद्दल बोलायचे झाल्यास, स्कूटरला पुढच्या बाजूला हायड्रॉलिक टेलिस्कोपिक देण्यात आले आहे, तर बॅक पॅनलवर ड्युअल ट्यूब टेक्नोलॉजीसह ड्युअल शॉकर्स आहेत.

Okinawa Praise+ चे फीचर्स

ओकिनावा iPraise+ मध्ये जिओ टॅगिंग, जीपीएस, फाइंड माय स्कूटर, बॅटरी हेल्थ, व्हेइकल स्टेटस सारखे फीचर्स देखील येतात. अँड्रॉइड ओएसवर काम करणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने स्कूटरपर्यंत पोहोचता येते. यात गॅस चार्ज फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल डिस्क अपफ्रंट सारखे फीचर्सही मिळतात. यात एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प आहेत. या स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले ही स्कूटर 1,05,990 रुपयांना येते.

या स्कूटर्सना टक्कर

ओकिनाव्हाच्या या स्कूटरचा TVS iQube, Ather 450X, Ola S-1 आणि Bajaj Chetak या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी मुकाबला होणार आहे. कारण या सर्व स्कूटर्स एकाच प्राइस सेगमेंटमध्ये येतात. TVS ची इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 75 किमी अंतर कापते. तर अॅथर 450 एक्स 116 किलोमीटरची रेंज देते. याशिवाय बजाज चेतक 95 किमीची रेंज देते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Electric scooter Okinawa Praise+ can give 139KM Range in single charge, will compete with TVS iQube, Ather 450X, Bajaj Chetak)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI