सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, 100KM टॉप स्पीड, EVTRIC च्या तीन इलेक्ट्रिक टू व्हीलर्स बाजारात

ईव्हीटीआरआयसी मोटर्स या इलेक्ट्रिक वाहन जगतामधील नवीन व्हेंचरने ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये ईव्ही‌ इंडिया एक्स्पो 2021 मध्ये हाय स्पीड सेगमेंटमधील आपल्या तीन इलेक्ट्रीक टू व्हीलर्स सादर केल्या आहेत.

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, 100KM टॉप स्पीड, EVTRIC च्या तीन इलेक्ट्रिक टू व्हीलर्स बाजारात
EVTRIC unveils three new high-speed electric Two wheelers
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 1:32 PM

मुंबई : ईव्हीटीआरआयसी मोटर्स या इलेक्ट्रिक वाहन जगतामधील नवीन व्हेंचरने ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये ईव्ही‌ इंडिया एक्स्पो 2021 मध्ये हाय स्पीड सेगमेंटमधील आपल्या तीन इलेक्ट्रीक टू व्हीलर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये ईव्हीटीआरआयसी राईज (मोटरसायकल), ईव्हीटीआरआयसी मायटी (स्कूटर) आणि ईव्हीटीआरआयसी राईड प्रो (स्कूटर) यांचा समावेश आहे. (EVTRIC unveils three new high-speed electric Two wheelers, know Top speed and range)

ब्रँडने या प्रसिद्ध ईव्ही एक्स्पोच्या महत्त्वाच्या मंचावर विशेष अशा ऑफर्सची माहिती‌ सादर केली आणि आकर्षक डिझाईनसह अद्ययावत तंत्रज्ञान असल्यामुळे त्यांना प्रेक्षकांनी विशेष पसंती‌ दिली. सर्व बाबींसह यातील डिस्प्ले हाय स्पीड लाईन अपशी साजेसा आहे. योग्य ऊर्जा असलेल्या या टू व्हीलर्स आयसीई प्रकारांमध्ये इतरांशी तुल्यबळ आहेत.

ईव्हीटीआरआयसी राईज (EVTRIC Rise) : ही‌ हाय स्पीड मोटरसायकल या ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक टू व्हीलर आहे.यामध्ये आकर्षक स्टाईलसह उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आहे. अनेक युजर्ससाठी चार्जिंग ही अडचणीची बाब असल्याचे लक्षात आल्यामुळे, ब्रँडने या बाईकसह 3.0 KWH लिथिअम आयन डिटॅचेबल बॅटरी दिली आहे. ही बाईक 100 किमी/ तास इतक्या वेगाने धावते. तसेच ती सिंगल चार्जवर 120 किमी अंतर कापण्यासाठी समर्थ आहे.

ईव्हीटीआरआयसी मायटी (EVTRIC Mighty): ब्रँडच्या या हाय स्पीड स्कूटरमध्ये रायडर्ससाठी आरामदायक आणि उत्तम सुविधा आहेत. ही स्कूटर सहजपणे 70 किमी/ तास इतका सर्वाधिक वेग घेऊ शकते व सिंगल चार्जवर 90 किमी अंतर जाऊ‌ शकते.

ईव्हीटीआरआयसी राईड प्रो (EVTRIC Ride Pro) : ईव्हीटीआरआयसीने सादर केलेली ही आणखी एक वेगवान स्कूटर आहे व तिची सर्वाधिक गती 75 किमी/ तास आहे व ती सिंगल चार्जवर 90 किमी अंतर पार करते.

EV सेगमेंटमधील क्वालिटी प्रोडक्ट्स

ईव्हीटीआरआयसीच्या सहभागाविषयी बोलताना ईव्हीटीआरआयसी मोटर्सचे संस्थापक आणि एमडी मनोज पाटील म्हणाले की, “भारतातील ईव्ही टू व्हीलर उद्योगामध्ये दर्जा उंचावणारी उत्पादने आणणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी संपूर्ण ईव्हीटीआरआयसी टीम प्रयत्न करत आहे. उद्योगातील विशेषज्ञ, प्रेक्षक, ऑटो विशेषज्ञ आणि युजर्सकडून विशेष कौतुक व मान्यता मिळणाऱ्या लक्षणीय नावीन्यपूर्णतांना समोर आणण्यासाठी या ईव्ही एक्स्पो 2021 ने आम्हांला परिपूर्ण संधी मिळवून दिली. मार्केटचे सखोल अध्ययन करून आणि ग्राहकांचा अभिप्राय जाणून घेतल्यावर आम्ही या उत्पादनांची रेंज बनवली आहे.

पाटील म्हणाले की, “भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने नवीन आहेत आणि अद्याप खूप काही केले जाणे बाकी आहे. परंतु जर ग्राहकांची मानसिकता योग्य प्रकारे लक्षात घेतली गेली नाही, तर उद्योगामधील एकूण विकास दर कमी होईल. त्यामुळे आम्ही ग्राहकाचा विचार करणारे ब्रँड आहोत आणि अशी उत्पादने अशा प्रकारे देत आहोत जी वैशिष्ट्यपूर्ण घटक, लक्षवेधी डिझाईन आणि उत्तम तंत्रज्ञान अशा ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करतील.”

देशात 70 वितरकांचे नेटवर्क

या ब्रँडने आधीच भारतभरामध्ये 70 पेक्षा जास्त वितरकांचे मजबूत नेटवर्क उभे केले आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत 150 वितरक हे त्यांचे उद्दिष्ट आहे. प्रसिद्ध अशा ईव्ही इंडिया एक्स्पो 2021 मधील सहभागामुळे हे होण्यास सहाय्य मिळेल आणि ब्रँड सर्वांशी संवाद साधेल आणि आपल्या जमेच्या बाजू समोर ठेवेल. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली- एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 2021- 22 या आर्थिक वर्षामध्ये लक्षणीय उपस्थिती बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

इतर बातम्या

Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स

(EVTRIC unveils three new high-speed electric scooters: Top speed & range)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.