AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

इलेक्ट्रिक व्हेइकल स्टार्टअप कंपनी GT फोर्सने त्यांच्या तीन टू व्हीलर्सचे अनावरण केले आहे. हे लॉन्च कंपनीच्या 2021 EV India Expo दरम्यान झाले, जे ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आले होते.

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत
प्रातिनिधिक फोटो (फोटो सोर्स : GT Force फेसबुक)
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 5:40 PM
Share

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक व्हेइकल स्टार्टअप कंपनी GT फोर्सने त्यांच्या तीन टू व्हीलर्सचे अनावरण केले आहे. हे लॉन्च कंपनीच्या 2021 EV India Expo दरम्यान झाले, जे ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आले होते. यापैकी एक हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, दुसरी कमी स्पीडवाली इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि तिसरे उत्पादन मोटरसायकल आहे, जो एक प्रोटोटाइप आहे. (EV startup GT Force unveils two E-scooters and E bike)

GT Drive आणि GT Drive Pro अशी या इलेक्ट्रिक स्कूटरची नावे आहेत. प्रो व्हेरियंट ही हाय स्पीड स्कूटर आहे जिचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 150 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल. ही इलेक्ट्रिक स्कूटर लिथियम-आयन बॅटरी आणि तीन ड्रायव्हिंग मोडसह येते. तीन मोडमध्ये इकॉनॉमी, स्टँडर्ड आणि टर्बो नावाचे पर्याय आहेत. या स्कूटरमध्ये, रायडरला क्रूझ कंट्रोलची सुविधा देखील मिळेल, ज्यामुळे युजरला कॉन्स्टंट स्पीड मिळेल.

याशिवाय, स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या रायडर्ससाठी कमी रेंज असलेली स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यात आली आहे, जी सिंगल चार्जमध्ये 75 किमी अंतर कापू शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास इतका आहे. ही स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये येते, त्यापैकी एक लीड अॅसिड आहे आणि दुसरी लिथियम-आयन बॅटरी आहे.

इलेक्ट्रिक बाइक 2022 च्या मध्यात लॉन्च होण्याची शक्यता

या दोन इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय कंपनी एका इलेक्ट्रिक बाइकवरही काम करत आहे, ज्याबद्दल कंपनीने स्वतः माहिती दिली आहे. ही इलेक्ट्रिक बाइक 2022 च्या मध्यात लॉन्च केली जाईल. मात्र, या मोटरसायकलबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. तसेच, तिन्ही उत्पादनांच्या किंमतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

बाजारात तकडी स्पर्धा

या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी पुढचा रस्ता सोपा नाही. किंबहुना, गेल्या एका वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंट मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि अजूनही अनेक चांगली उत्पादने बाजारात लाँच होणार आहेत. अशा परिस्थितीत, जीटी फोर्सच्या या स्कूटर्स सिंपल वन आणि ओला एस1 सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी स्पर्धा करतील, जे उत्तम ड्रायव्हिंग रेंज आणि आकर्षक डिझाइनसह येतात.

दुसऱ्या बाजूला GT फोर्सची आगामी बाईक भारतात हळूहळू लोकप्रिय होत असलेल्या Revolt च्या RV सिरीजमधील इलेक्ट्रिक बाइकशी स्पर्धा करेल.

इतर बातम्या

Ratan Tata birthday : आलिशान घर, प्रायव्हेट जेट ते कोट्यवधींच्या कार, बर्थडे बॉय रतन टाटांविषयी सर्वकाही

E Scooter : One-Moto नं लॉन्च केलं Electa, एका चार्जिंगमध्ये धावणार 50 किलोमीटर!

Mahindra Automotive 2022 : महिंद्रा लॉन्च करणार नव्या लोगो आणि डिझाइनसह XUV300

(EV startup GT Force unveils two E-scooters and E bike)

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.