AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MG Astor ची पहिली झलक सादर, अशी असेल देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्सवाली कार

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) बुधवारी आपल्या MG Astor कारवरून पडदा हटवला. कंपनीच्या सध्याच्या MG ZS EV ची ही पेट्रोल आवृत्ती आहे.

MG Astor ची पहिली झलक सादर, अशी असेल देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्सवाली कार
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 20, 2021 | 5:50 PM
Share

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) बुधवारी आपल्या MG Astor कारवरून पडदा हटवला. कंपनीच्या सध्याच्या MG ZS EV ची ही पेट्रोल आवृत्ती आहे. पण कंपनीने त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यामुळे ती देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) वाली कार ठरते. चला तर मग या कारच्या फीचर्सविषयी जाणून घेऊया… (first glimpse of MG Astor, it will be the first car with artificial intelligence in country)

MG Astor मध्ये, कंपनीने पर्सनल AI असिस्टंट दिलं आहे. या कारच्या पर्सनल AI असिस्टंटला पॅरालिम्पिक खेळाडू आणि खेलरत्न दीपा मलिक यांनी आवाज दिला आहे. एसयूव्ही विभागातील ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंट भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सर्वात स्पर्धात्मक आहे. क्रेटा ते सेल्टॉस आणि कुशक पर्यंत, येथे प्रत्येक वाहनाचा स्वतःचा एक यूएसपी आहे. अशा परिस्थितीत, एमजी मोटर इंडिया अॅस्टरला अद्वितीय वैशिष्ट्यांसह पॉवर-पॅक पर्याय म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

ग्राहकांना तीन इंटीरियर थीममधून आवडती थीम निवडता येईल. त्यापैकी एक म्हणजे ड्युअल-टोन संगरिया रेड. MG Astor मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा समावेश आहे. इतर स्टँडर्ड फीचर्समध्ये JioSaavn अॅप, आणि MapMyIndia द्वारे मॅप्स आणि नेव्हिगेशन सेवा समाविष्ट आहेत.

एमजी मोटर इंडिया Astor ला हवेशीर फ्रंट सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या सुविधांनी सुसज्ज करण्याची अपेक्षा आहे. एमजी मोटर इंडिया त्याच्या कारमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला पर्सनल असिस्टंट ऑफर करत आहे जे अमेरिकन फर्म स्टार डिझाईनने बनवले आहे. या विभागात पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 टेक्नोलॉजी दिली जात आहे.

MG Astor ची किंमत

MG Astor ची किंमत आगामी सणासुदीच्या हंगामात जाहीर होण्याची शक्यता आहे. एसयूव्हीची किंमत 10 लाख ते 16 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस किंवा टाटा हॅरियरशी Astor ला स्पर्धा करावी लागेल.

तर बातम्या

महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(first glimpse of MG Astor, it will be the first car with artificial intelligence in country)

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?