अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदला, Gogoro Viva Electric Scooter भारतात लाँच होणार

तैवानची इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी गोगोरोने (Gogoro) नुकतीच हिरो मोटोकॉर्पशी भागीदारी केली आहे. (Gogoro Viva Electric Scooter)

अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदला, Gogoro Viva Electric Scooter भारतात लाँच होणार
Gogoro Viva

मुंबई : तैवानची इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी गोगोरोने (Gogoro) नुकतीच हिरो मोटोकॉर्पशी भागीदारी केली आहे. या कंपनीने भारतात त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर गोगोरो व्हिवाची (Gogoro Viva) नोंदणी केली आहे. Gogoro Viva स्कूटर तरुणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केली आहे. या स्कूटरचं डिझाइन खूप आकर्षक आहे. (Gogoro Viva electric scooter registered in India, going to launch soon)

ही स्कूटर वाइब्रेंट रंगांसह सादर करण्यात आली आहे. स्कूटरमध्ये LCD इन्स्ट्रुमेंट पॅनेल आहे जे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येतं. Gogoro ईव्हीची भारतात नोंदणी झाली आहे, अशातच हिरो मोटोकॉर्पशी भागीदारीनंतर हे वाहन भारतीय बाजारात येण्यास थोडा वेळ लागू शकेल. या स्कूटरमध्ये 3kW इलेक्ट्रिक मोटर आहे. कंपनीने म्हटले आहे की, यात इंटीग्रेटेड मोटर आणि कंट्रोलर सिस्टम देण्यात आली आहे.

इंजिन आणि फीचर्स

बेसिक आणि प्रीमियम आवृत्त्यांसह स्कूटर विदेशात 2 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. या स्कूटरच्या बेसिक व्हेरिएंटची इलेक्ट्रिक मोटर 85Nm टॉर्क देते तर प्रीमियम व्हेरिएंट 115Nm टॉर्क देते. ही स्कूटर दोन रायडिंग मोड ऑफर करते. ही स्कूटर सुपरबूस्ट आणि नॉर्मल मोडसह सुसज्ज आहे.

ही स्कूटर 30 किमी प्रतितास वेगाने 85 किमीची रेंज देते. त्याच वेळी, वाहनाची बॅटरी 60 सेकंदात बदलली जाऊ शकते. इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन केवळ 80 किलो आहे. कार सीटची उंची 740mm इतकी आहे आणि ग्राहकांसाठी ती खूपच आरामदायक आहे. या स्कूटरच्या सस्पेंशनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, ट्विन रियर शॉक अब्जॉर्बर, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक आणि सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टम किंवा SBS मिळेल.

हिरो स्कूटरचं नाव बदलणार?

Gogoro जेव्हा ही स्कूटर भारतात लाँच करेल, तेव्हा हिरो मोटोकॉर्प कंपनी या स्कूटरचं नाव बदलू शकते. या स्कूटरचं नवं नाव काय असेल, याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हिरो आणि गोगोरो या दोन्ही कंपन्या मिळून भारतात बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क वाढविण्याच्या विचारात आहेत.

इतर बातम्या

सिंगल चार्जमध्ये 240Km रेंज,’या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्ससमोर अनेक मोठ्या बाईक फेल

‘या’ इलेक्ट्रिक सायकलसमोर ऑटो फेल, एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावणार

सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, Ford च्या ‘या’ गाडीसाठी ग्राहकांच्या रांगा, एका दिवसात 20,000 बुकिंग्स

(Gogoro Viva electric scooter registered in India, going to launch soon)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI