सिंगल चार्जमध्ये 240Km रेंज,’या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्ससमोर अनेक मोठ्या बाईक फेल

आम्ही आज तुमच्यासाठी टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) घेऊन आलो आहोत, ज्या अनेक मोठ्या बाईक्सना मात देऊ शकतात.

1/6
भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एका बाजूला कार्सचा जलवा पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला अनेक स्कूटर आणि दुचाकीही लाइनअपमध्ये आहेत. बर्‍याच कंपन्या आता या सेगमेंटला लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत, ज्या अनेक मोठ्या बाईक्सना मात देऊ शकतात.

2/6
ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooter) : ओला लवकरच ही स्कूटर भारतीय बाजारात लाँच करणार आहे. यामध्ये Etergo AppScooter वापरलेल्या स्वॅपेबल बॅटरी पॅकचा वापर केला जाऊ शकतो. ही स्कूटर सिंगल चार्जवर 240 कि.मी. चा प्रवास करेल.

3/6
सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक (Suzuki Burgman Electric Scooter) : जपानी ऑटोमोबाईल कंपनी लवकरच भारतीय बाजारात सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक ही स्कूटर लाँच करु शकते. या स्कूटरच्या स्पेक्सबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यामध्ये एलईडी हेडलॅम्प्ससह दमदार फीचर्स दिले जाऊ शकतात.

4/6
सिंपल एनर्जी स्कूटर (Simple energy Electric Scooter) : बंगळुरू आधारित स्टार्ट-अप कंपनी सिंपल एनर्जी मार्क 2 (Simple Energy Mark 2) नावाची ही स्कूटर लॉन्च करू शकते. यात 4.8kW बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर सिंगल चार्जवर 240 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. ही स्कूटर फक्त 3.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडेल.

5/6
हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक स्कूटर (Hero Motocorp Electric Scooter) : हिरोने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी Gogoro बरोबर भागीदारी केली आहे. कंपनी फिक्स्ड बॅटरीसह स्वॅपेबल बॅटरी मॉडेलवर देखील काम करत आहे. सध्या, या स्कूटरच्या स्पेक्सबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु कंपनी Maestro स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हेरिएंटदेखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.

6/6
अ‍ॅथर मॅक्सी स्कूटर (Ather Maxi Scooter) : अ‍ॅथर एनर्जी सध्या भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर्स क्षेत्रात वर्चस्व गाजवते. कंपनीने यापूर्वीच बर्‍याच राज्यात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन स्थापित केले आहेत. स्कूटरमध्ये विंडस्क्रीन, बोल्ड फ्रंट अ‍ॅप्रॉन आणि लाँग सीटसह बरेच फीचर्स दिले जाऊ शकतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI