
जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या झूम 160 स्कूटरची विक्री अधिकृतपणे संपूर्ण भारतात सुरू केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंडिया मोबिलिटी शोमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाल्यानंतर या स्कूटरने त्याच्या मजबूत डिझाइन आणि कामगिरीच्या आश्वासनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही कंपनीची पहिली मॅक्सी-स्टाईल स्कूटर आहे आणि सध्या ती प्रमुख मॉडेल देखील आहे. ही स्कूटर बाजारात टीव्हीएस एनटॉर्क 150 सारख्या मॉडेल्सला टक्कर देणार आहे.
xoom 160 ही स्कूटर रोजच्या कामांसाठी तसेच ॲडव्हेंचर या दोन्हीसाठी डिझाइन केलेली आहे. उंच रायडिंग पोझिशन, मोठे 14-इंच अलॉय व्हील्स, ब्लॉक-पॅटर्न टायर्स आणि मस्क्युलर डिझाइन देण्यात आलेली आहे.
तसेच ही स्कूटर लवकरच भारतातील सर्व हिरो प्रीमिया डीलरशिपवर उपलब्ध होईल. ती ऑनलाइन देखील बुक करता येईल. भारतात त्याची किंमत सुमारे 1.49 लाख एक्स-शोरूम आहे. मात्र जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर त्याची किंमत कमी होईल.
Xoom 160 मध्ये 156 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आहे जे 8000 rpm वर 14.69 bhp पॉवर आणि 6,250 rpm वर 14 NM टॉर्क निर्माण करते. हे सेटअप जलद एक्सेलेरेशन आणि चांगले मायलेज देण्याचे आश्वासन देते. यात हिरोची i3S सायलेंट-स्टार्ट सिस्टम आणि 4-व्हॉल्व्ह टेक्नॉलॉजी देखील आहे. लिक्विड-कूलिंग टेक्नॉलॉजी अशा स्कूटरला दमदार बनवते जे एअर-कूल्ड इंजिन वापरणाऱ्या स्कूटरपेक्षा चांगले बनते.
फीचर्सच्या बाबतीतही Xoom 160 मागे नाही. यात स्मार्ट की सिस्टम, रिमोट सीट अॅक्सेस, ड्युअल-चेंबर एलईडी हेडलॅम्प, एबीएससह फ्रंट डिस्क ब्रेक आणि ब्लूटूथ-कनेक्टेड डिजिटल कन्सोल आहे, ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील आहे. या फीचर्समुळे, ही स्कूटर तिच्या सेगमेंटमधील सर्वात फीचर्स-लोडेड मानली जाते.