AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hero ची क्रांती; Splendor आणि HP Deluxe मॉडल पेट्रोलवर नाही तर धावणार इथेनॉलवर… Flex fuel बाईकची किंमत काय?

Hero Splendor And HP Deluxe Flex Fuel Bike: मध्य-पूर्वेतील युद्ध पुन्हा भडकले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढण्याची भीती आहे. आता लोक पर्यायाकडे वळत आहेत. हिरो कंपनीने दुचाकीत नवीन प्रयोग केला आहे. इथेनॉलवर धावणारी दुचाकी बाजारात आणली आहे.

Hero ची क्रांती; Splendor आणि HP Deluxe मॉडल पेट्रोलवर नाही तर धावणार इथेनॉलवर... Flex fuel बाईकची किंमत काय?
Splendor आणि HP Deluxe धावणार इथेनॉलवर
| Updated on: Jun 04, 2026 | 4:26 PM
Share

Hero Splendor And HP Deluxe Flex Fuel Bike: देशात प्रत्येक महिन्यात लाखो दुचाकींची विक्री होते. या दुचाकी पेट्रोलवर धावतात. आता काही इलेक्ट्रिक दुचाकीही बाजारात आल्या आहेत. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) देशात फ्लेक्स फ्युएल (Flex Fuel) बाईक लाँच केली आहे. नवी दिल्लीत आयोजित एका खास कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री यांनी ही दुचाकी बाजारात आणली. सर्वसामान्यांसाठी कंपनीने लोकप्रिय मॉडल्स स्प्लेंडर प्लस (Splendor+) आणि एचएफ डीलक्स (HF Deluxe) फ्लेक्स-फ्यूएलमध्ये आणले आहे.

किती आहे या बाईकची किंमत?

दिल्लीत Hero Splendor+ फ्लेक्स-फ्युएल व्हेरिएंट आणि एक्स-शोरूम किंमत 82,710 रुपये इतकी आहे. तर Hero HF Deluxe चे फ्लेक्स फ्युएल व्हेरिएंटची एक्स-शोरूमची किंमत 72,792 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही बाईक पेट्रोलसह इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलवर सहज धावेल. तांत्रिकदृष्ट्या ही बाईक खास पद्धतीने तयार करण्यात आली आहे. E20 (20% इथेनॉल) ते E85 (85% इथेनॉल) पर्यंत इंधनावर ही बाईक धावू शकते. सध्या भारतात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. पण जेव्हा देशात इथेनॉल मिश्रीत पेट्रोल मिळेल, तेव्हा सुद्धा ही बाईक न कुरकुर करता धावेल.

स्वच्छ ऊर्जेकडे भारताचे पाऊल

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे मत व्यक्त केले. देश आता स्वच्छ आणि पर्यायी ऊर्जेकडे अत्यंत गतीने जात असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्यांसाठी फ्लेक्स फ्युएलवर आधारीत तंत्रज्ञान आणणे हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे महागड्या इंधनाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. क्रूड ऑईलची आयात कमी झाल्याने देशाचा पैसा वाचणार आहे. तर इथेनॉलचा वापर वाढल्याने देशातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. इथेनॉल कृषीआधारीत उत्पादनातून तयार करण्यात येईल. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. शेतकऱ्यांच्या हाती पैसा येईल. तर सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त इंधन पर्याय उपलब्ध होईल. आत्मनिर्भर भारत आणि विकसीत भारतासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ