
होंडाने २०२५ च्या जपान मोबिलिटी शोमध्ये सुपर – वन प्रोटोटाईप इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. ही कार २०२५ गुडवूड फेस्टीव्हलमध्ये दाखवलेल्या सुपर ईव्ही कॉन्सेप्टवर आधारित आहे. ३.४ मीटरहून कमी लांबीची ही कॉम्पॅक्ट कार केई कार स्पेसिफिकेशनचे पालन करते. यात स्पोर्टी डिझाईन, २-स्पोक स्टीअरिंग व्हील आणि बूस्ट मोड सारखे फिचर्स आहेत.
हा प्रोटोटाईप आधीपेक्षा अधिक प्रोडक्शन रेडी आहे. त्यामुळे निकटच्या काळात ही कार लाँच होऊ शकते. ही नवीन कार कशी आहे हे पाहूयात…
Honda Super-One Prototype ही एक कॉम्पॅक्ट टॉलबॉय हॅचबॅक कार आहे. जी केई कार स्पेसिफिकेशनला फॉलो करते. हीची लांबी ३.४ मीटरहून कमी आहे. त्यामुळे या कारला पार्किंगसाठी खूपच कमी जागा लागणार आहे. हिचा रुंद बेस आणि फ्लेअर व्हील आर्चेस ही एक स्पोर्टी आणि एंगेजिंग ड्राईव्ह प्रदान करतो. हीचा आकार चौकाना सारखा असून यात फ्लॅट क्लॅमशेल बोनट, फ्लॅश – इश फासिया आणि एक स्क्वायर्ड-ऑफ रिअर आहे.ग्लास टेलगेटचे डिझाईन काही प्रमाणात Honda Brio शी मेळ खाणारे आहे, ज्यामुळे ही कार आणखीनच आकर्षक दिसते.
कारच्या समोरच्या भागात सर्क्युलर LED हेडलाईट्स आणि तीन भागात विभागलेले LED DRLs आहेत. हेडलाईट्सच्या दरम्याने एक ब्लॅक प्लेट देखील दिलेली आहे, ज्यात चार्जिंग पोर्ट फ्लॅप्स आणि एक एअर इंटेकसाठी जागा देखील आहे.
Honda Super-One Prototype च्या इंटेरिअरला पाहून हे स्पष्ट होते की ही एक प्रोडक्शन-रेडी मॉडेल आहे. हिच्या आत २ – स्पोक स्टीअरिंग व्हील, लयर्ड डॅशबोर्ड आणि बहुतांशी कामासाठी फिजिकल बटणे दिलेली आहे. यात दोन डिस्प्ले ( एक होरिजेंटल इंफोटेनमेंट स्क्रीन आणि एक स्क्वायर इंस्ट्रुमेंटेशन डिस्ल्पे ) मिळतात.
होंडाने यात एक ७ – स्पीड गिअरबॉक्स सिमुलेटेड फिल आणि स्पोर्टी व्हर्च्युअल इंजिन साऊंड जोडला आहे. या उद्देश्य ICE कार सारखी एंगेजिंग ड्राईव्ह प्रदान करणे आहे.
मात्र, पॉवरट्रेन संदर्भात होंडाने अधिक माहिती दिलेली नाही. परंतू उल्लेखनीय बाब ही की Boost Mode फंक्शनद्वारे हिला चांगल्या परफॉर्मन्ससाठी तयार केलेले आहे. होंडाच्या मते ही कार एक इंटरेस्टींग आणि सपोर्टीव्ह ड्रायव्हींगचा अनुभव प्रदान करणारी आहे.
Honda Super-One Prototype ला साल २०२६ रोजी लाँच केले जाऊ शकते. सर्वात आधी ही कार जपान, युके आणि काही अन्य देशात लाँच केली जाऊ शकते. मात्र, भारतात ही कार केव्हा लाँच होणार याबाबत काहीही माहिती कंपनीने दिलेली नाही. परंतू येणाऱ्या काळात ही कार भारतात देखील लाँच केली जाऊ शकते.