OLA-UBER दंडेलीतून सुटका होणार ? ‘भारत टॅक्सी’ येणार, काय आहे योजना?
ओला-उबर सारख्या खाजगी टॅक्सीच्या डायनामिक भाड्यातून आता सर्वसामान्य प्रवाशांची सुटका होणार आहे. आता या परदेशी कंपन्याला तोंड देण्यासाठी भारताची 'भारत टॅक्सी' सेवा सुरु होणार आहे.

OLA-UBER या प्रायव्हेट टॅक्सीच्या जाचातून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. खाजगी टॅक्सी चालकांच्या अरेरावीला रोखण्याची आता वेळ आल्याचे म्हटले जात आहे. भाड्याच्या नावाने अनेक छुपे चार्जेस लावण्याच्या खाजगी टॅक्सींचा अंत आता जवळ आल्याने म्हटले जात आहे. कारण आता देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा Bharat Taxi नावाने सुरु होणार आहे.
भारत टॅक्सीचा पहिला पायलट प्रोजेक्ट सर्वात आता नोव्हेंबरपासून दिल्ली येथून सुरु होणार आहे. ६५० चालकांसह या सेवेचा पहिला फेज सुरु होत असून यात महिला सारथी देखील असणार आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून देशभरातील इतर राज्यात या टॅक्सी सेवेचा विस्तार होणार आहे.चला पाहूयात काय आहे योजना…
राष्ट्रीय सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म
‘भारत टॅक्सी’ ही एक सरकारी कॅब सर्व्हीस असून यास सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-गर्व्हनन्स डिव्हीजनने तयार केले आहे. यात ड्रायव्हरना देखील मालकी हक्क असणार आहे. यासाठी सहकार टॅक्सी कॉ -ऑपरेटीव्ह लिमिटेड सोबत अलिकडेच करार करण्यात आला आहे. हे सदस्यता आधारित मॉडेल आहे. ज्याला सहकार टॅक्सी को-ऑपरेटीव्ह लिमिटेड चालवणार आहे.अमुल डेअरी जशी चालते त्या धर्तीवर ही सहकार टॅक्सी चालणार आहे. याची स्थापना जूनमध्ये ३०० कोटी रकमेसह झाली आहे.
या सेवेच्या संचालन समितीचे चेअरमन आहेत अमूलचे एमडी जयेन मेहता. एनसीडीसीचे उपप्रबंधक निदेशक रोहित गुप्ता व्हाईस चेअरमन आहेत. भारत टॅक्सीचे ऐप नोव्हेंबरपासून डाऊनलोड करता येतणार आहे. आधी हे ऐप हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजीत असणार आहे. डिसेंबर ते मार्च २०२६ पर्यंत राजकोट, मुंबई, पुणे येथे सेवा सुरु होणार आहे. एप्रिल ते डिसेंबर दरम्यान लखनऊ,भोपाळ, जयपूर येथे सुरुवात होणार आहे. २०२७-२८ मध्ये २० शहरांमध्ये आणि २०२८-३० दरम्यान जिल्हा मुख्यालये, गावातही या सेवेचा विस्तार होणरा आहे.
# डायनामिक प्रायझिंग, पिक प्रायझिंग, मान्सून प्रायझिंग, हिवाळा प्रायझिंग, उन्हाळा प्रायझिंग, गाडी उपलब्ध नाही प्रायझिंग या सर्वांमधून सुटका होणार आहे. फिस्क आणि वाजवी भाडे असणार आहे.
# कॅब सेफ्टी मोठा मुद्दा असल्याने भारत टॅक्सी या पोलिस ठाण्याशी इंटेग्रेशन असतील. डिस्ट्रेस बटणाची सुविधा असेल संकटात पॅनिक बटण दाबल्यास जवळच्या पोलिस ठाण्यास माहिती मिळणार आहे.
# ड्रायव्हरकडून कमिशनच्या जागी सदस्यता शुल्क घेतले जाईल, दर राईड मागे १०० टक्के कमाई ड्रायव्हरला मिळेल. त्यांना केवळ दैनिक, साप्ताहिक वा मासिक शुल्क द्यावे लागणार आहे.
# महिला ‘सारथी’ म्हणजे महिला ड्रायव्हर्सचा देखील समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० महिला ड्रायव्हर सेवेत असतील साल २०३० पर्यंत त्यांची संख्या १५ हजार होणार आहे.
