Car Smell : पावसाळ्यात कारमधून येतो दुर्गंध, मग या टिप्स वापरून पहा

smell in car पावसाळ्याच्या दिवसात आर्द्रतेमुळे बऱ्याच वेळा कारमधून एका विशिष्ट वास अथवा दुर्गंध येत असतो. मात्र कारची नियमितपणे साफ-सफाई केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. ताज्या हवेसाठी ड्रायव्हिंग करताना खिडकी थोडा वेळ तरी उघडी ठेवावी.

Car Smell : पावसाळ्यात कारमधून येतो दुर्गंध, मग या टिप्स वापरून पहा
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: social
अजय देशपांडे

|

Aug 03, 2022 | 2:19 PM

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी हवेतील ओलावा किंवा आर्द्रतेमुळे (humidity) आपल्या कारमध्ये एक कुबट वास (bad smell in car) किंवा दुर्गंध येत असतो. मस्त पावसात फिरायला जायचा प्लॅन असताना, या वासामुळे तुमच्या ट्रीपचा उत्साह मावळू शकतो. कारमधील हा वास डोकेदुखीचे एक कारण ठरू शकतो. कारच्या खिडक्या जास्त वेळ उघड्या न ठेवल्यास हवा खेळती रहात ( no air circulation) नाही, त्यामुळेही कुबट वास येतो. अस्वच्छता हेही त्या वासामागचे एक कारण असते. प्रवासादरम्यान आपण अनेक पदार्थ खातो, त्यांचे कण सांडतात, चहा-कॉफी पितो, ते कागदी कप अथवा खाद्यपदार्थांची पाकिटे राहतात, आणि या सर्व गोष्टी वेळच्यावेळी साफ न केल्यास त्यांचा वासही गाडीत भरून राहतो व दुर्गंध येण्यास सुरूवात होते. खाली दिलेल्या काही टिप्सचे पालन केले तर कारमधील दुर्गंध कमी होईल आणि तुम्हाला प्रवासाचा मनमुराद आनंद लुटता येईल.

तुमच्या कारला श्वास घेऊ द्या :

जेव्हा तुम्ही दिवसभर प्रवास करून रात्री घरी येता आणि कार पार्क करता, तेव्हा सर्व दारं – खिडक्या पूर्णपणे, नीट लॉक केलेल्या असतात. त्यामुळे कारमध्ये हवा खेळती रहात नाही. रात्रभर कार बंद राहिल्याने एक विशिष्ट वास येतो. सकाळी जेव्हा तुम्ही कारमध्ये बसायला जाता, तेव्हा हा वास भसकन नाकात शिरतो. त्यामुळे कारमध्ये बसून पुढचा प्रवास सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ कारच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, ताजी हवा आत येऊ द्यावी.

री-सर्क्युलेशनची मदत घ्या :

प्रत्येक कारमध्ये हवा री-सर्क्युलेट करण्यासाठी एक बटण दिलेले असते. ते दाबल्यावर कारमध्ये ताज्या हवेचा प्रवाह खेळता राहतो. विशेषत: तुम्ही कारमध्ये बसून काही खात असाल, तेव्हा हे बटण नक्की सुरू करावे. मात्र जर कोणी धूम्रपान करत असेल तर कारची खिडकी त्वरित उघडावी आणि एअर कंडीशन रि-सर्क्युलेट मोडवर सेट करावा.

कार स्वच्छ ठेवा

रात्री कार पार्क करण्यापूर्वी त्यामधील सर्व कचरा आठवणीने जमा करा. चहा-कॉफीचे कप, चिप्स अथवा इतर खाद्यपदार्थांची पाकिटे, सिगरेटचे अथवा खाद्यपदार्थांचे सांडलेले तुकडे वगैरे गोष्टी स्वच्छ करून कार साफ करावी. या गोष्टी दिसताना अगदी छोट्या वाटतात, मात्र त्यांच्यामुळेच कारमध्ये रात्रभर दुर्गंधी येत राहते. त्यामुळे कारचे इंटिरिअर नेहमी स्वच्छ राखावे.

आवडीचा परफ्यूम कारमध्ये फवारा :

कारमध्ये नेहमी चांगल्या प्रतीचा आणि तुमच्या आवडीचा परफ्युम फवारावा. त्याबद्दल कोणतीही चूक होऊ देऊ नका. परफ्युमच्या सुगंधामुळे कारचा प्रवास सुखकर होतो. जर तुम्हाला परफ्युम नको असेल तर एखादा डिओही फवारू शकता. मात्र हा डिओ, स्प्रे किंवा परफ्युम कधीही कारच्या सीटवर अथवा डॅशबोर्डवर सरळ फवारू नका. कारच्या सर्व खिडक्या बंद करून केवळ हवेत हा स्प्रे फवारावा.

हे सुद्धा वाचा

बेकिंग सोडा

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोड्याचे कारमध्ये काय काम ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. कारमधील दुर्गंध दूर करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे बेकिंग सोडा. कारमधील कुबट , घाणेरडा वास दूर करायचा असेल तर कारमध्ये सर्व जागी बेकिंग सोडा थोड्या-थोड्या प्रमाणात टाकावा. बेकिंग सोडा हा कारमधील दुर्गंधी शोषून घेतो. थोड्या वेळानंतर व्हॅक्युम क्लीनरने कार स्वच्छ, साफ करून घ्यावी.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें