Electric car : …तर ठरतील जगातले पहिले पंतप्रधान! नरेंद्र मोदींच्या ताफ्यात येणार आर्मर्ड इलेक्ट्रिक कार!

देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार भरपूर सबसिडी देतात. लोकांनी इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.

Electric car : ...तर ठरतील जगातले पहिले पंतप्रधान! नरेंद्र मोदींच्या ताफ्यात येणार आर्मर्ड इलेक्ट्रिक कार!
नरेंद्र मोदी/इलेक्ट्रिक कार (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 8:04 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशातच नव्हे तर परदेशातही खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यात मोदी मर्सिडीज मेबॅच S650 गार्ड सारख्या अनेक आर्मर्ड लक्झरी गाड्या आहेत. CarandBikeच्या रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक कारचा समावेश होऊ शकतो. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात सरकार लवकरच बख्तरबंद इलेक्ट्रिक कारचा (Electric car) समावेश करू शकते. जगातील इतर मोठे नेते सुद्धा बख्तरबंद गाड्या वापरतात, पण त्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार दिसत नाहीत. असे झाल्यास आर्मर्ड इलेक्ट्रिक कार वापरणारे पंतप्रधान मोदी कदाचित जगातील पहिले जागतिक नेते असतील. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी इलेट्रिक गाड्या वापरण्याचे सरकार सांगत आहे. त्यात आता खुद्द पंतप्रधानांच्या ताफ्यातच इलेक्ट्रिक गाडी दाखल होणार आहे.

कोणती इलेक्ट्रिक कार निवडली जाणार?

पंतप्रधान मोदींसाठी कोणती इलेक्ट्रिक कार निवडली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इलेक्ट्रिक कारचे युग सर्वांसाठी अगदी नवीन आहे आणि आर्मर्ड इलेक्ट्रिक कारची नेमकी संख्या सध्या उपलब्ध नाही. मात्र, पंतप्रधान मोदींचे SUV प्रेम सर्वश्रुत आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी SUV इलेक्ट्रिक कारची निवड केली, तर मर्सिडीज EQS SUV हा चांगला पर्याय ठरू शकतो.

इलेक्ट्रिक व्हेइकलला मिळेल चालना

देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार भरपूर सबसिडी देतात. लोकांनी इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. भारतीय ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्यास तेलावरील आपले अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल. दुसरीकडे खुद्द पंतप्रधानांनीही इलेक्ट्रिक कार वापरली तर त्याचा संदेश दूरपर्यंत जाईल.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांची सध्याची गाडी

मर्सिडीज Maybach S650 गार्डशिवाय रेंज रोव्हर वोग आणि टोयोटा लँड क्रूझरचाही पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. बख्तरबंद गाड्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या कार बुलेटप्रूफ आहेत आणि स्फोटांपासून संरक्षण करतात. इलेक्ट्रिक कारही या कार्सप्रमाणेच पॉवरफुल बनवल्या जातील.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.