Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल संपल्यावरही हायब्रीड कार चालेल? जाणून घ्या

पेट्रोल संपले तर माईल्ड हायब्रीड कार पुढे जाऊ शकणार नाही. तर फुल हायब्रीड कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर्स आणि पेट्रोल इंजिन दोन्हीचे कॉम्बिनेशन असतं. या गाड्या कमी वेगाने काही अंतर इलेक्ट्रिक मोडमध्ये धावू शकतात, पण बॅटरी डिस्चार्ज होताच पेट्रोल इंजिनची गरज भासते. तर तिसरी कार म्हणजे प्लग-इन हायब्रीड कार. या कारमध्ये मोठी बॅटरी असते. ही एक्सटर्नल चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. याविषयी अधिक विस्ताराने जाणून घेऊया.

पेट्रोल संपल्यावरही हायब्रीड कार चालेल? जाणून घ्या
CarImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Feb 07, 2025 | 3:08 PM

पेट्रोल कारपेक्षा हायब्रीड कार अधिक इंधन-कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक असल्याने त्या झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. परंतु अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की जर पेट्रोल संपले तर हायब्रीड कार चालेल का? उत्तर आपली कार कोणत्या प्रकारच्या हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित आहे यावर अवलंबून असते. याविषयी पुढे जाणून घेऊया.

माईल्ड हायब्रीड कार

माइल्ड हायब्रीड कारमध्ये पेट्रोल इंजिनला सपोर्ट करण्यासाठी छोटी बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जातो. या गाड्या पूर्णपणे बॅटरीवर धावू शकत नाहीत तर इंधनाचा वापर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर्सवर अवलंबून असतात. पेट्रोल संपले तर माईल्ड हायब्रीड कार पुढे जाऊ शकणार नाही.

फुल हायब्रीड कार

फुल हायब्रीड कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर्स आणि पेट्रोल इंजिन दोन्हीचे कॉम्बिनेशन असते. या गाड्या कमी वेगाने काही अंतर इलेक्ट्रिक मोडमध्ये धावू शकतात, पण बॅटरी डिस्चार्ज होताच पेट्रोल इंजिनची गरज भासते. टँकमध्ये पेट्रोल नसेल आणि बॅटरी चार्ज झाली नाही तरीही कारही धावू शकणार नाही.

प्लग-इन हायब्रीड कार

प्लग-इन हायब्रीड कारमध्ये मोठी बॅटरी असते, जी एक्सटर्नल चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. या कार इलेक्ट्रिक मोडमध्ये लांब पल्ल्यापर्यंत पेट्रोलशिवाय ही धावू शकतात. बॅटरी फुल चार्ज झाली तर पेट्रोल संपल्यानंतरही कार काही किलोमीटरपर्यंत धावू शकते.

इंधन टाकी नेहमी भरलेली ठेवावी का?

तुमची हायब्रीड कार सौम्य किंवा फुल हायब्रीड असेल तर तुम्हाला पेट्रोल संपणं कठीण होऊ शकतं. प्लग-इन हायब्रीड कार बॅटरी चार्ज केल्यावर थोडा दिलासा देऊ शकतात, परंतु लांब पल्ल्यासाठी पेट्रोल आवश्यक असेल. त्यामुळे टाकीमध्ये नेहमी पुरेसे इंधन ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत अडचण येणार नाही.

लक्ष्यात घ्या की, पेट्रोल संपले तर माईल्ड हायब्रीड कार पुढे जाऊ शकणार नाही. तर फुल हायब्रीड कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर्स आणि पेट्रोल इंजिन दोन्हीचे कॉम्बिनेशन असतं. या गाड्या कमी वेगाने काही अंतर इलेक्ट्रिक मोडमध्ये धावू शकतात, पण बॅटरी डिस्चार्ज होताच पेट्रोल इंजिनची गरज भासते. तर तिसरी कार म्हणजे प्लग-इन हायब्रीड कार. या कारमध्ये मोठी बॅटरी असते. ही एक्सटर्नल चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. पण या कार इलेक्ट्रिक मोडमध्ये लांब पल्ल्यापर्यंत पेट्रोलशिवाय ही धावू शकतात. आम्ही तुम्हाला या तिन्ही प्रकारांची माहिती सांगितली आहे. आता तुम्ही यापैकी निवडू शकतात.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.