Hyundai ची नवीन Grand i10 Nios, लाँचिंगचा मुहूर्त ठरला

Hyundai ची नवीन Grand i10  लवकरच भारतात लाँच होणार आहे. या नव्या गाडीला Hyundai Grand i10 Nios हे नाव देण्यात आलं आहे. ही गाडी येत्या 20 ऑगस्टला देशात लाँच होईल.

Hyundai ची नवीन Grand i10 Nios, लाँचिंगचा मुहूर्त ठरला

मुंबई : Hyundai ची नवीन Grand i10  लवकरच भारतात लाँच होणार आहे. या नव्या गाडीला Hyundai Grand i10 Nios हे नाव देण्यात आलं आहे. ही गाडी येत्या 20 ऑगस्टला देशात लाँच होईल. Grand i10 Nios हे नाव फक्त भारतासाठी असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात ही गाडी i10 या नावानेच विक्रीसाठी उपलब्ध असेल. Grand i10 च्या सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत Grand i10 Nios चं लूक खूप वेगळ आहे.

Grand i10 Nios कंपनीच्या Grand i10 ब्रांडची तिसरी जनरेशन कार आहे. ही गाडी सध्याच्या Grand i10 सोबतच विकली जाईल, म्हणजेच नवी गाडी लाँच झाल्यावरही Grand i10 ही गाडी बाजारात उपलब्ध असेल. नवीन गाडी Hyundai च्या लाईनअपमध्ये Grand i10 आणि Grand i20 च्या मधल्या सेगमेंटमध्ये लाँच केली जाईल. या गाडीचं डिझाईन काही अंशी Hyundai च्या नव्या Santro शी मिळतं-जुळतं आहे. या नव्या गाडीचं लूक स्पोर्टी वाटतं. यामध्ये कॅस्केडिंग ग्रिल देण्यात आलं आहे. यामुळे गाडीचा समोरचा लूक जबरदस्त वाटतो आहे. गाडीच्या मागच्या बाजुला ब्रॉड बंपर आहे, जो सध्याच्या मॉडेलच्या तुलनेतथोडा खाली लावण्यात आला आहे. यामुळे या गाडीचा रिअर लूक स्पोर्टी दिसतो.


इंटेरिअर : Hyundai Grand i10 Nios मध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. त्यासोबतच 8-इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टीमही देण्यात आला आहे. डॅशबोर्ड आणि डोरपॅड्सवर डिम्पल्ड टेक्स्चर्ड फिनिश  देण्यात आला आहे. गाडीचं एकूण ओव्हरऑल इंटेरिअर खूप चांगलं आहे. कंपनीने नव्या गाडीमध्ये कुठले नवे फीचर्स असणार आहेत याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. तरीही यामध्ये ऑटोमॅटीक एसी, सनरुफ, अँड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले आणि Hyundai ब्लुलिंक कनेक्टिव्हीटी सिस्टीम सारखे फीचर्स मिळू शकतात.

इंजिन :  Hyundai Grand i10 Niosc च्या इंजिनबाबत कंपनीने कुठलाही माहिती दिलेली नाही. यामध्ये सध्याच्या मॉडेलमध्ये असलेलं 1.2 लिटर पेट्रोल टँक आणि 1.2 लिटर डिझेल इंजिन मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दन्ही इंजिन बीएस-6 एमिशन नॉर्म्सनुसार असतील. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या Hyundai Grand i10 Nios मधील इंजिनचं पावर आऊटपूट थोडं जास्त असण्याची शक्यता आहे.

किंमत : Hyundai Grand i10 Nios ची बुकिंग सुरु झाली आहे. मात्र, याच्या किमतीबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, या गाडीची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असू शकते. सध्याच्या  Grand i10 ची किंमत 4.98 लाख ते 7.63 लाख रुपयांपर्यंत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : सचिन तेंडुलकर बाजूच्या सीटवर, ड्रायव्हींग सीटवर मिस्टर इंडिया?

तब्बल 800cc इंजिन, कावासाकीची नवी बाईक भारतात लाँच

ऑडीला टक्कर देणारी Porsche Macan Facelift भारतात लाँच, किंमत तब्बल…

टाटाची जबरदस्त कार लवकरच भारतात, किंमत फक्त…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI