गाडी चालवताना ‘हे’ 6 नियम तोडल्यास तुमचं लायसन्स जप्त होणार!

सेफ ड्रायव्हिंगबाबत मंत्रालय खूप जागरूक आहे, पण तरीही काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी परिवहन विभागाने यासाठी काही दंडही निश्चित केले आहेत.

गाडी चालवताना ‘हे’ 6 नियम तोडल्यास तुमचं लायसन्स जप्त होणार!
सेफ ड्रायव्हिंगबाबत मंत्रालय खूप जागरूक आहे, पण तरीही काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करतात.

मुंबई : परिवहन विभाग ते मंत्रालयापर्यंत मोटार वाहन कायद्याचे नियम सतत बदलत राहतात. तसेच बदललेले नियम लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हा विभाग वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतो, जेणेकरुन सर्व लोक त्याचे अनुसरण करू शकतील. सेफ ड्रायव्हिंगबाबत मंत्रालय खूप जागरूक आहे, पण तरीही काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी परिवहन विभागाने यासाठी काही दंडही निश्चित केले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच 6 महत्वाच्या नियमांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पालन तुम्ही केले नाहीत तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. अगदी आपला वाहन परवाना देखील जप्त केला जाऊ शकतो (Important driving rules in India).

पहिला नियम :

जेव्हा आपण कार चालवत असाल, तेव्हा गाडीत खूप मोठ्या आवाजात संगीत वाजवू नका. गाडीत मोठ्याने गाणी वाजवताना पकडले गेल्यास 100 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. त्याचबरोबर जर रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांसाठी हे कर्कश संगीत धोकादायक आहे, असे वाहतूक पोलिसांना वाटत असेल तर ही रक्कमही वाढवली जाऊ शकते. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त केले जाऊ शकते.

दुसरा नियम :

बर्‍याच लोकांना वेगाने वाहन चालवण्याचा आवड असते. असे करणे त्यांना मोठे साहस वाटते. आपणही वेगाने गाडीत हाकत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण असे केल्याने दंड होऊ शकतो किंवा आपला वाहन परवानाही जप्त होऊ शकतो. विशेषतः शाळा किंवा रुग्णालयाजवळ सरकारने गती मर्यादा निश्चित केली आहे. या मार्गांवर ताशी 25 किमीपेक्षा वेगाने गाडी चालवू नका.

तिसरा नियम :

वाहन चालवताना फोनवर बोलण्यास मनाई आहे. परंतु, यापासून बचाव होण्यासाठी बरेच लोक ब्लूटूथद्वारे वाहन चालवताना फोनवर बोलतात. परंतु हे देखील बेकायदेशीर आहे आणि असे केल्याने दंड किंवा परवान्याची जप्ती होऊ शकते (Important driving rules in India).

चौथा नियम :

रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग का आखले गेले आहे, हे आपल्याला माहिती आहे. पादचाऱ्यांना आरामात रस्ता ओलांडता यावा, हे त्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, बरेच लोक रेड सिग्नल असतानाही झेब्रा क्रॉसिंगपुढे गाडी थांबवतात, असे केल्यामुळे तुम्हाला दंड होऊ शकतो. इतकेच नाही तर असे केल्यावर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स काही महिन्यांसाठी निलंबितही केले जाऊ शकतो.

पाचवा नियम :

प्रेशर हॉर्नच्या वापरास संपूर्ण देशात बंदी आहे. इतकेच नाही तर वाहनावर प्रेशर हॉर्न बसवणे बेकायदेशीर ठरते, कारण तो एक प्रकारचा बदल आहे आणि कोणत्याही वाहनला स्वत:च्या इच्छेने बदल करण्याची परवानगी नाही. यासाठी परवाना जप्त करण्याबरोबरच मोठा दंडही लावला जाऊ शकतो.

सहावा नियम :

सरकारने रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवेला नेहमी प्राधान्य देण्यास सांगितले आहे. जेणेकरून गरजू लोकांना योग्य वेळी रुग्णालयात दाखल करता येईल. परंतु काही लोक गर्दीत रुग्णवाहिकांना मार्गही देत ​​नाहीत. असे केल्याने आपल्याला मोठा दंडही होऊ शकतो किंवा परवाना जप्त केला जाऊ शकतो.

(Important driving rules in India)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI